अखेर समोर आलाच इरफान पठानच्या पत्नीचा हिजाब न घातलेला फोटो, एकेकाळी होती ‘मॉडेल’

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते. विशेष करून इरफान पठाण याची पत्नी कशी दिसते याबाबत गेल्या काही वर्षापासून चर्चा गेल्या झालेले आहेत. मात्र इरफान पठाण याच्या पत्नीचा अजूनही फोटो समोर आलेला नाही.
इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसूफ पठाण हे भारतीय क्रिकेटमध्ये एक जबरदस्त खेळाडू म्हणून कार्यरत होते. मात्र या दोघांची कारकीर्द अल्पावधीतच संपुष्टात आली, असे आपल्याला म्हणावे लागेल. जेमतेम आठ ते दहा वर्षे या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे मात्र, त्यांच्यामध्ये आणखीन खेळ शिल्लक होता.
मात्र, त्यांना संधी मिळाली नाही अशी टीका देखील अनेकदा होत असते. इरफान पठाण हा डावखुरा वेगवान गोलंदाज सोबतच फलंदाज देखील आहे. अतिशय आक्रमक रित्या इरफान हा बॅटिंग करत असतो. तसेच त्याचा भाऊ युसुफ पठाण हादेखील अतिशय आक्रमक फलंदाज आहे. आयपीएल कडून देखील या दोघांनीही अनेक सामने खेळले आहेत.
आता इरफान पठाण हा समालोचकाच्या भूमिकेत आपल्याला दिसत असतो. तसेच तो सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो. इरफान पठाण याने आपले करिअर अतिशय खडतर परिस्थिती मधून पूर्णत्वास नेले आहे. तसेच भाऊ युसुफ पठाण याने देखील याच परिस्थितीचा सामना केला आहे. इरफान त्याच्या वडिलांची परिस्थिती ही जेमतेमच होती.
मात्र, असे असूनही आपल्या मुलांना त्यांनी खूप शिकवले. त्यानंतर त्यांचा खेळातील कल पाहून क्रिकेट खेळण्याची पण त्यांनी मुलांना संधी उपलब्ध करून दिली आणि मुलांनी देखील निराश केले नाही. इरफान पठाण हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाजलेला खेळाडू म्हणून गौरवल्या जातो. त्याचा भाऊ देखील याच गौरवाचा हक्कदार आहे.
आता पठाण याच्या पत्नी बाबत देखील अनेक पोस्ट सोशल मीडियावर फिरत असतात. आता देखील एक पोस्ट इरफानच्या पत्नीबद्दल आली आहे. इरफान पठाण याची पत्नी सफा बे.ग ही प्रसिद्ध सौदी अरेबियातील एक मॉडल होती आणि तिची काही वर्षांपूर्वी इरफानसोबत ओळख झाली. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आता सफा बेग ही कायमच हिजाबमध्ये वावरत असते. मात्र, काही दिवसांपूर्वी तिचा बिगर हिजाबचा फोटो समोर आला आहे. त्यानंतर तिचे सोशल मीडियावर फोटो देखील व्हायरल झाले आहेत. इरफानची पत्नी सफा बेग ही एक प्रसिद्ध सौदी मॉडेल होती. ती हैदराबादला राहत होती.
मात्र, नंतर तिचे कुटुंब सौदीला स्थायिक झाले. तिथेच तिचे शिक्षण झाले. मात्र, लग्न झाल्यावर तिने मॉडेलिंग कायमचे सोडले. आता सफा उत्तम गृहिणी आहे.