ह्या लोकप्रिय मराठी मालिकांवर भडकले प्रेक्षक !

ह्या लोकप्रिय मराठी मालिकांवर भडकले प्रेक्षक !

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका या सुरू आहेत. मात्र, यातील काही वाहिन्यांवरील मालिका या लोकप्रिय ठरल्या आणि नंतर आता प्रेक्षकांना त्यांचा कंटाळा देखील येऊ लागला आहे. अशा मालिका या तातडीने बंद कराव्या अशी, मागणी आता अनेक प्रेक्षक करू लागले आहेत.

याचे कारण म्हणजे या मालिकेचे कथानक आता अतिशय भरकटत चालले आहे. त्यामुळेच या मालिका कंटाळवाण्या होत आहेत. त्याचप्रमाणे मालिकांमध्ये अश्लील प्रकार देखील दाखवण्याचे प्रघात पाडण्यात येत आहेत, अशी टीका देखील प्रेक्षक करत आहेत.

स्टार प्रवाह या वाहिनीवर रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिका जोरकसपणे सुरू आहेत. या मालिका आता विनाकारण लांबवण्यात आले आहेत, असे देखील अनेक जण म्हणत आहेत. काही मालिकांनी 550 भागांचा टप्पा पार केला आहे. तरी या मालिका रटाळ पणे सुरूच आहेत.

विनाकारण या मालिका लांबवण्यात येत आहेत, अशी टीका आता प्रेक्षक करत आहेत. सगळ्यात आधी आई कुठे काय करते ही मालिका सुरू होऊन आता जवळपास दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, ही मालिका जबरदस्तीने पुढे नेण्यात येत आहे. या मालिकेत प्रत्येक व्यक्ती गणिक वेगळी कहाणी दाखवण्यात येत आहे.

अरुंधती, ईशा, गौरी, यश, अभिषेक यासारख्या पात्रांच्या वेगवेगळ्या प्रेम कहाण्या आणि दोन दोन अफेअर दाखवण्यात येत आहे. त्यामुळे या मालिकेतून नेमका बोध घ्यायचा तरी काय? अशी विचारणा प्रेक्षक करत आहेत. लेखक विनाकारण मालिका ताणत आहे, असे म्हणून प्रेक्षक आता या मालिकेला चांगले शिव्या घालताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिकाही सुरुवातीला काही दिवस चांगली वाटली होती.

मात्र, आता ही मालिका कंटाळवाणी होत आहे, असे अनेक जण म्हणत आहेत. जयदीप आणि गौरी यांची दाखवलेली कहाणी आता वेगळ्या वळणावर भरकटत आहे, असे देखील अनेक जण म्हणत आहेत. या मालिकेमध्ये शालिनी वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर हिने साकारली आहे.

माधवी निमकर ही देखील एक दिग्गज अशी अभिनेत्री आहे. तिने साकारलेली खलनायीकेची भूमिका प्रेक्षकांना सध्या खूप आवडत आहे. मात्र, या मालिकेमध्ये आता विनाकारण काहीही दाखवण्यात येत असल्याचे प्रेक्षक म्हणत आहेत, तर तिसरी मालिका म्हणजे रंग माझा वेगळा. रंग माझा वेगळा ही मालिका सुरुवातीचे काही दिवस चांगली दाखवण्यात आली होती.

मात्र आता ही मालिका देखील भरकटतच चालली आहे. या मालिकेमध्ये दीपा आणि कार्तिक यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. या मालिकेतही अफेअर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक मालिकांमध्ये असे अफेअर दाखवणे गरजेचे आहे का? असे देखील प्रेक्षक विचारू लागले आहेत, तर अशाच या मालिका सुरू राहिल्या तर एक दिवस आपली संस्कृती लयाला जाईल, असे देखील अनेक जण म्हणत आहेत.

त्यामुळे तातडीने या मालिका बंद करा, असे प्रेक्षकांनी म्हणत मालिकेचा दिग्दर्शक लेखकांवर टीकेचा भडीमार केला आहे.

Team Beauty Of Maharashtra