ह्या लोकप्रिय अभिनेत्रीची होणार ‘लग्नाची बेडी’ या मालिकेमध्ये एन्ट्री…

ह्या लोकप्रिय अभिनेत्रीची होणार ‘लग्नाची बेडी’ या मालिकेमध्ये एन्ट्री…

स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या लग्नाची बेडी ही मालिका अतिशय जोरदारपणे सुरू आहे. या मालिकेला प्रेक्षकाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षापासून आई कुठे काय करते ही मालिका देखील स्टार प्रवाहवर सुरू आहे.

मात्र, आता ही मालिका रटाळ होत असल्याने या मालिकेचा सगळा प्रेक्षक वर्ग आता लग्नाची बेडी या मालिकेकडे वळला आहे. लग्नाची बेडी ही मालिका आहे एका हिंदी मालिकेवर आधारित असल्याचे सांगण्यात येते. लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपल्याला सिंधू, राघव, राजश्री, मधु यासारखे वेगवेगळे पात्र दिसत आहेत. सध्या या मालिकेला जबरदस्त असा रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे.

सिंधूची भूमिका या मालिकेमध्ये अभिनेत्री सायली देवधर हिने केली आहे, तर राघवच्या भूमिकेमध्ये आपल्याला संकेत पाठक हा दिसला आहे. मालिकेमध्ये तो इन्स्पेक्टरच्या भूमिकेमध्ये आहे तर मधुच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री रेवती लेले ही दिसली आहे. रेवती रेल्वे हिने या आधी देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

यापूर्वी तिने स्वामिनी या मालिकेत देखील काम केले होते. स्वामिनी मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यानंतर ती आता लग्नाची बेडी या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिकेमध्ये दिसत आहे. नकारात्मक भूमिकेमध्ये दिसत असली तरी तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. मधु म्हणजेच रेवती लेले हिच्या बॉयफ्रेंडचे नाव आदिश वैद्य असे आहे.

सध्या मालिका विश्वामध्ये गणेशोत्सव मोठ्या धूम धडाक्यात सुरू आहे. सध्या राज्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कारण कोरोनानंतर दोन वर्षानंतर मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत आहे. राजकारणी मंडळी सोबतच मराठमोळे कलाकार देखील मोठ्या भक्ती भवाने गणेशोत्सव साजरा करत आहेत.

दीड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा दहा दिवसाचा अशा अनुक्रमे गणपती अनेकांकडे बसत असतात, तर दहा दिवसाचा गणपती ज्यांच्याकडे असतो त्यांच्याकडचा उत्साह खूपच पाहण्यासारखा असतो. मराठी सेलिब्रिटी देखील गणपती बसवतात. मात्र अनेकांकडे दीड दिवसाचा गणपती बसवण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात आहे, तर आता मालिका विश्वामध्ये देखील गणरायाचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले आहे.

आई कुठे काय करते लग्नाची बेडी, रंग माझा वेगळा या सगळ्याच मालिकांमध्ये आता गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे. लग्नाची बेडी या मालिकेत देखील आता गणपतीचे आगमन होणार आहे. या भागाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे, तर लग्नाची बेडी या मालिकेमध्ये गणेश प्रतिष्ठापना करण्यासाठी एका खास अभिनेत्रीची देखील एंट्री होणार आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रंग माझा वेगळा मधील सौंदर्या म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर. हर्षदा खानविलकर आणि सिंधू म्हणजेच अभिनेत्री सायली देवधर या दोघी मिळून गणेशाची प्रतिष्ठापना करणार आहेत. त्यानंतर सौंदर्य ही सिंधू हिला मोलाचा सल्ला देणार आहे की, आता तू पुढे लढाई कशाप्रकारे लढायची हे सांगणार आहे.

तर लग्नाची बेडी मालिकेतील आपल्याला कुठली भूमिका आवडते आम्हाला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra