‘ब्रेकअप’ नंतर या 7 अभिनेता-अभिनेत्रींनी कधीही नाही केले एकत्र काम

‘ब्रेकअप’ नंतर या 7 अभिनेता-अभिनेत्रींनी कधीही नाही केले एकत्र काम

बॉलीवुड मध्ये कपडे बदलल्या सारखे अभिनेता व अभिनेत्री गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बदलत असतात. बॉलीवूड मधील अभिनेता आणि अभिनेत्री यांना याबाबत काहीही वाटत नाही. मात्र काही अपवादात्मक स्थितीमध्ये असे अभिनेते आहेत की ज्यांनी आयुष्यभर आपल्या पार्टनरची साथ दिली आहे.

मात्र अनेक कलाकार असे आहेत की ब्रेक-अप नंतर पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसलेले आहेत. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर अशा कुठल्या अभिनेता व अभिनेत्रींनी एकत्र काम केले नाही, याबाबत माहिती देणार आहोत चला तर मग जाणून घेऊया..

1) सलमान खान, ऐश्वर्या राय – बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झालेली जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची आहे. हम दिल दे चुके सनम या चित्रपटानंतर हे दोघेही एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडालेले होते. मात्र सलमान खान ऐश्वर्याला मारझोड करत असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. त्यानंतर ऐश्वर्याने त्याच्यासोबत ब्रेकअप केले. त्यानंतर या दोघांनी एकत्र कधीही काम नाही केले.

2) बिपाशा बासू, जॉन अब्राहम – बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम ही जोडी देखील बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होती. या दोघांचे अनेक वर्षे प्रेम संबंध होते. मात्र ब्रेक-अप नंतर हे दोघेही वेगळे झाले. त्यानंतर या दोघांनी एकत्र काम केले नाही.

3) रविना टंडन, अक्षय कुमार – नव्वदच्या दशकामध्ये सर्वाधिक हॉट जोडी म्हणून अक्षय कुमार, रवीना टंडन या जोडीकडे पाहिले जायचे. हे दोघेही खूप सिरीयस रिलेशनशिपमध्ये होते. मात्र अक्षय कुमार याने रवीना टंडनला धोका देऊन शिल्पा शेट्टी ला डेट करणे सुरू केले. त्यानंतर या दोघांच्या नात्यात ब्रेक-अप झाल. त्यानंतर रविना टंडन अक्षय कुमार यांनी एकत्र कधीही काम नाही केले.

4) शाहरुख खान, प्रियंका चोप्रा – शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा यांनी डॉन या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, शाहरुखचे आधीपासूनच लग्न झालेले आहे. याबाबत गौरी खान हिला माहिती मिळाली. गौरीने या दोघांना वेगळे केले. त्यानंतर शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा यांनी एकत्र काम केले नाही.

5) ऐश्वर्या राय, विवेक ओबेराय – सलमान खान सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय ही विवेक ओबेरायला डेट करू लागली होती. हे दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसत होते. मात्र, विवेक ओबेराय याने सलमान खानने ऐश्वर्या हिला कसा त्रास दिला, याबाबत जाहीरपणे माहिती दिली. त्यानंतर विवेक ओबेराय आणि ऐश्वर्या राय हेदेखील वेगळे झाले. त्यानंतर या दोघांनी एकत्र कधीही काम केले नाही.

6) करीना कपूर, शाहीद कपूर – करीना कपूर आणि शाहिद कपूर यांची जोडी बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त चर्चा असलेली जोडी होती. मात्र, करीना कपूर ने सैफ अली खान सोबत लग्न केले. तर शाहिद कपूरने मीरा राजपूत सोबत लग्न केले. या दोघांनी शेवटचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट केला होता त्यानंतर ‘उडता पंजाब’ मध्ये दोघांनी काम केले. मात्र सोबत स्क्रिन शेअर केली नाही. त्यानंतर हे दोघे एकत्र कधीही दिसले नाही.

7) करिष्मा कपूर, अभिषेक बच्चन – करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चन या दोघांचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा देखील त्या काळात होती. मात्र, या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. या दोघांनी सर्वात शेवटी हा ‘मैने भी प्यार किया’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर या दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही.

Team Beauty Of Maharashtra