फोटोतील ‘या’ मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?, ३६ वर्षांपूर्वी त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आणि चित्रपट आजही आहेत लोकप्रिय

साधारणत: 70 ते 80 च्या दशकामध्ये अनेक चित्रपट मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आले होते. याच काळामध्ये अनेक हिट चित्रपट देखील आले. मात्र, काही चित्रपटांचा अपवाद वगळता सर्व चित्रपट दर्जेदार असे होते. काही चित्रपट हे सुमार दर्जाचे होते. केवळ सरकारचे अनुदान लाटण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत होती.
मात्र त्या काळामध्ये व्ही शांताराम, भालजी पेंढारकर या सारखे निर्माते-दिग्दर्शक मराठी चित्रपट सृष्टीला लाभले. त्यांनी अनेक चांगल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. जुन्या काळामध्ये मोहन गोखले सारखे कलाकार देखील होते. त्यांनी अनेक चांगल्या चित्रपटांमधून काम केले.
त्या नंतरच्या काळामध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांनी देखील अनेक दर्जेदार चित्रपट तयार केले. यामध्ये महेश कोठारे यांचे नाव देखील आपल्याला घ्यावे लागेल. महेश कोठारे यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. लक्ष्मीकांत बेर्डे याला घेऊन त्यांनी अनेक चित्रपट केले होते.
यामध्ये धूमधडाका, झपाटलेला यासारख्या चित्रपटांचा समावेश होता. सचिन पिळगावकर यांनी ‘अशी ही बनवा बनवी’ हा चित्रपट तयार केला. मात्र, असे असले तरी जुन्या काळामध्ये जबरदस्त चित्रपट आले होते. सुधीर फडके यांच्या श्रवणीय गाण्यांनी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले होते.
‘फिटे अंधाराचे जाळे’ पासून ‘जैत रे जैत’ या चित्रपटांमधील गाणी देखील लोकप्रिय ठरली होती. जब्बार पटेल यांनी ‘जैत रे जैत’ या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन केले होते. आज आम्ही एका अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. याबाबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फोटोमध्ये ही अभिनेत्री दिसत आहे. ही अभिनेत्री साधारणता छत्तीस वर्षांपुर्वी एका चित्रपटात दिसली होती. त्यावेळेस हा चित्रपट प्रचंड गाजला होता. 1984 मध्ये ‘हेच माझं घर’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये ‘ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा’, हे गीत प्रसिद्ध झाले होते. या गीताला अफाट लोकप्रियता त्यावेळेस मिळाली होती.
हे गीत अनेकांच्या ओठावर त्यावेळेस आले होते. ‘हेच माझं घर’ या चित्रपटामध्ये सुलभा देशपांडे, मधू कांबीकर, रविंद्र महाजनी, अशोक सराफ, रंजना, मोहन गोखले, शर्मिला मेढेकर यांच्या भूमिका होत्या. हा फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये शर्मिला मेढेंकर यादेखील दिसताहेत. 36 वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे.
त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. काही वर्ष चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी दिग्दर्शक निर्माते सतीश कुलकर्णी यांच्या सोबत लग्न केले. सतीश कुलकर्णी आणि त्यांनी मिळून श्री तुलसी प्रोडक्शन ची स्थापना केली होती. या प्रोडक्शनच्या अंतर्गत ‘एकापेक्षा एक’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गंमत जंमत’ यासारखे हिट चित्रपट आले होते.
तर आपल्याला ‘हेच माझं घर’ मधील शर्मिला मेंढेकर यांची भूमिका आवडली होती का? ते आम्हाला नक्की सांगा