लग्नानंतर आता ‘ऋता दुर्गुळे’ ने दिली डबल ‘गुडन्यूज’

अभिनेत्री हृता दुर्गुळेने काही दिवसांपूर्वीच आपला प्रियकर प्रतीक शाह याच्यासोबत लग्न केले आहे. प्रतीक याच्यासोबत लग्न केल्यानंतर याबाबतची चर्चा सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात रंगली होती.
तिने कुठले मंगळसूत्र घातले, स्टेजवर कुठले डेकोरेशन केले, कुठली साडी घेतली आणि जेवणामध्ये काय मेनु होता, याबद्दल देखील चर्चा रंगली होती. लग्नानंतर ही जोडी हनिमूनला फिरायला देखील गेली होती. याबाबतची चर्चा देखील प्रचंड सोशल मीडियावर रंगली होती. तसेच तिने मन उडू उडू झाल ही मालिका सोडली की काय, अशी चर्चा रंगली होती.
मात्र, तिने ही मालिका सोडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मन उडू उडू झालं या मालिकेमध्ये ऋता दुर्गुळे दिपूची भूमिका साकारत आहे, तर याच मालिकेमध्ये आपल्याला इंद्राच्या भूमिकेमध्ये अजिंक्य राऊत हा अभिनेता दिसत आहे. ऋता हिच्या लग्नाला अजिंक्य राऊत हा गेला नव्हता. त्यामुळे देखील सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती.
तो नाराज आहे की, काय अशी चर्चा रंगली होती. मात्र, याबाबत अजिंक्य राऊत याने स्पष्टीकरण देऊन सांगितले होते की, माझ्या आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे मी ऋताच्या लग्नाला गेलो नाही. तिच्या सासूबाई सोबत माझे बोलणे देखील झाले होते, असे त्याने सांगितले. तिच्या सासू मुग्धा शहा या देखील मराठीतील दिग्गज अभिनेत्री आहेत.
लग्नामुळे ऋता हिने मालिका सोडली की काय अशी चर्चा झाली होती. मात्र, आता ती मालिकेच्या सेटवर पुन्हा एकदा परतली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. अतिशय लोभस, गोंडस चेहरा आणि जबरदस्त अभिनय यामुळे ती कायम लोकप्रिय अभिनेत्री मध्ये गणली जाते.
आता तिने डबल गुड न्यूज दिली आहे. आम्ही ही डबल आपल्याला सांगणार आहोत. ऋता आता मन उडू उडू झालं या मालिकेत तर परत आलीच आहे. मात्र तिचे येत्या काही दिवसात तब्बल दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. होय आपण ऐकलं ते खरं आहे. तिचा अनन्या हा बहुप्रतिक्षित चित्रपट 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच ऋताचा टाइमपास 3 हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये दगडू आणि पालवी यांची कहानी आता अजून पुढे सरकताना दिसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दगडू आणि पालवी या दोघांच्या भूमिका आता अतिशय वेगळ्या पद्धतीने दिसणार आहे. ऋता ही पालवी पाटील या भूमिकेत टाइमपास थ्री मध्ये अतिशय धमाकेदार भूमिकेमध्ये दिसणार आहे.
यामध्ये ऋताने अतिशय जबरदस्त अशी भूमिका टाइमपास थ्री मध्ये केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये प्रथमेश परब, वैभव मांगले ऋता दुर्गुळे यांच्यासह इतरांची भूमिकादेखील असल्याचे सांगण्यात येते. रवी जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
29 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांचे देखील डोळे या चित्रपटाकडे लागले आहेत.