तुम्हाला माहीत आहे का हिरा रत्न कोणत्या राशींसाठी असतो शुभ अशुभ? छोटीशी चुक पडू शकते महागात… जाणून घ्या सविस्तर

तुम्हाला माहीत आहे का हिरा रत्न कोणत्या राशींसाठी असतो शुभ अशुभ? छोटीशी चुक पडू शकते महागात… जाणून घ्या सविस्तर

पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या नवरत्नांपैकी हिरा म्हणजेच डायमंड हे रत्न सगळ्यात सुंदर आणि मौल्यवान रत्न मानले जाते. याचे सौंदर्य आणि चमक यामुळे हिरा सर्वच लोकांना हवाहवासा वाटतो. हिरा हे केवळ एक मौल्यवान रत्नच नाही तर ज्योतिष शास्त्रातही हे अतिशय लोकप्रिय आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हिरा हे शुक्र ग्रहाचे रत्न मानले गेले आहे.

हिऱ्याला प्लॅटिनम किंवा चांदीच्या अंगठीमध्ये बसवून ती अंगठी शुक्रवारी धारण करणे शुभ मानले जाते. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार हिरा हे सुंदर रत्न असले तरीही ते सर्व व्यक्तींनी वापरणे चुकीचे आहे. हिरा हे रत्न तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती बळकट करण्याचे काम करते. याच्या शुभ प्रभावामुळे आपल्याला सुख-समृद्धी,आणि ऐश्वर्य प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीसाठी हिरा ठरतो शुभफलदायी आणि कोणत्या राशींसाठी अशुभ…

मेष राशी- जर तुमची रास मेष असेल आणि तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह दुसऱ्या किंवा सातव्या स्थानाचा स्वामी असेल तर तुम्ही हिरा हे रत्न धारण करू नये.कारण हिरा हे रत्न धारण केल्यास तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी हिरा हे रत्न धारण करणे टाळावे.

वृषभ राशी- शुक्र ग्रह हा वृषभ राशीचा स्वामी आहे.ज्योतिष शास्त्रानुसार हिरा हे रत्न शुक्र ग्रहाचे आहे असे मानले जाते.त्यामुळे या राशीतील व्यक्तींनी हिरा परिधान करणे लाभदायी ठरते.वृषभ लग्न असणाऱ्या व्यक्तींनी हिरा धारण केल्यास त्यांच्यासाठी हे रत्न शुभफलदायी ठरते.या राशीतील शुक्र ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी हिरा अतिशय लाभदायक आहे.तसेच यामुळे तुम्हाला कित्येक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

मिथुन राशी- मिथुन राशीमध्ये शुक्र हा पाचव्या आणि द्वादश स्थानाचा स्वामी आहे त्यामुळे या राशीतील व्यक्तींसाठी शुक्र ग्रह शुभ मानला जातो.म्हणून मिथुन राशीच्या व्यक्ती हिरा हे रत्न धारण करू शकतात.असे केल्याने त्यांना शुक्र ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते.तसेच बौद्धिक व्यवहारातही यशप्राप्ती होते.

कर्क राशी- कर्क राशीमध्ये शुक्र ग्रह चतुर्थ आणि एकादश स्थानाचा स्वामी आहे त्यामुळे शुक्र ग्रहाच्या महादशेच्या काळात हिरा हे रत्न धारण करणे लाभदायक ठरते.तसेच यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह शुभफलदायी बनतो.जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहदोष नसेल तर हिरा हे रत्न तुम्ही धारण करावे की नाही यासंबंधी एखाद्या ज्योतिषाकडून सल्ला घ्यावा.

सिंह राशी- सिंह राशीमध्ये शुक्र ग्रह हा तिसऱ्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी मानला जातो.या राशीसाठी शुक्र अशुभ फलदायी ठरतो त्यामुळे या व्यक्तींनी हिरा हे रत्न धारण करू नये.अन्यथा त्यांना नोकरीधंद्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.हिरा धारण करण्याची इच्छा असल्यास तो धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्यावा.

कन्या राशी- कन्या राशीमध्ये शुक्र ग्रह हा दुसऱ्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी आहे.या राशीसाठी शुक्र ग्रह शुभ मानला जातो त्यामुळे कन्या राशीतील व्यक्तींनी हिरा हे रत्न धारण करण्यास काहीही हरकत नाही.या व्यक्तींनी हिरा हे रत्न धारण केल्यास त्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती सुधारते आणि त्यांना सर्वच क्षेत्रात यशप्राप्ती होते.

तूळ राशी- तूळ राशीमध्ये शुक्र ग्रह लग्नस्थानाचा म्हणजे प्रथम स्थानाचा स्वामी आहे.त्यामुळे तूळ राशीतील व्यक्तींनी अगदी निश्चिंतपणे आयुष्यभर हिरा हे रत्न धारण करावे.या राशीतील व्यक्तींना हिरा हे रत्न कधीही अशुभ फलदायी ठरत नाही.उलट हे रत्न धारण केल्यास त्यांचे व्यक्तित्व जास्त आकर्षक बनते तसेच सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीमध्ये शुक्र ग्रह हा सातव्या आणि द्वादश स्थानाचा स्वामी मानला जातो.वृश्चिक राशीमध्ये मंगळ ग्रह हा लग्न स्थानाचा स्वामी आहे आणि मंगळ व शुक्र ग्रह हे एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात.त्यामुळे या राशीतील व्यक्तींनी हिरा हे रत्न धारण करू नये.अन्यथा त्यांच्या जीवनात एकाचवेळी अनेक समस्या उद्धभवू शकतात तसेच याचा त्यांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

धनू राशी- धनू राशीमध्ये शुक्र ग्रह सहाव्या आणि अकराव्या स्थानाचा स्वामी आहे.या स्थानी शुक्र असल्याने धनू राशीतील व्यक्तींसाठी हिरा हे रत्न धारण करणे अशुभ मानले गेले आहे.त्यांनी हे रत्न धारण केल्यास शुक्र ग्रह त्यांना अशुभ फळ देण्यास सुरुवात करतो.तसेच पैसे आणि आरोग्याशी संबंधित कित्येक समस्या त्यांच्या आयुष्यात निर्माण होऊ शकतात.

मकर राशी- मकर राशीमध्ये शुक्र ग्रह पाचव्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी मानला जातो.या स्थानी शुक्र ग्रह अतिशय लाभदायी ठरतो.त्यामुळे मकर राशीतील व्यक्तींसाठी हिरा हे रत्न परिधान करणे शुभफलदायी ठरते.हे रत्न धारण केल्यास त्यांना सर्वच क्षेत्रात लाभ मिळतो तसेच आयुष्यातील सर्व समस्या नाहीश्या होतात.

कुंभ राशी- कुंभ राशीमध्ये शुक्र ग्रह चौथ्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी आहे.या राशीसाठी हिरा हे रत्न अतिशय लाभदायी ठरते.कुंभ राशीतील व्यक्ती शुक्र ग्रहाची महादशा असतानाही हिरा हे रत्न धारण करू शकतात.हे रत्न धारण केल्याने त्यांचे नशीब बळकट होते तसेच त्यांची सर्व कामे सहज पार पडतात.

मीन राशी- मीन राशीमध्ये शुक्र ग्रह हा तिसऱ्या आणि आठव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीतील व्यक्तींसाठी हिरा हे रत्न परिधान करणे अशुभ मानले जाते. मीन या राशीमध्ये गुरू ग्रह हा लग्न स्थानाचा स्वामी आहे. गुरू ग्रह हा देवतांचा गुरू तर शुक्र ग्रह हा आसुरांचा गुरू मानला जातो. त्यामुळे हे परस्परांचे शत्रूग्रह आहेत.म्हणून या राशीच्या व्यक्तींनी कधीही हिरा रत्न धारण करू नये.अन्यथा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra