गरोदर असूनही जिद्दीने ही अभिनेत्री बनली डॉक्टर, बाळाला घेऊनच घेतली पदवीदान सोहळ्यात डिग्री

गरोदर असूनही जिद्दीने ही अभिनेत्री बनली डॉक्टर, बाळाला घेऊनच घेतली पदवीदान सोहळ्यात डिग्री

आजवर समाजामध्ये आपण अनेक असे लोक पाहिले आहेत की, अतिशय खडतर परिस्थितीनंतर त्यांनी मोठे यश संपादन करून आपले आयुष्य सुखी केलेले आहे. मात्र, असे यश हे फार कमी जणांना मिळत असते. कुठलेही यश मिळवण्यासाठी त्यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक असतात. एखादी गोष्ट करताना त्यामध्ये पहिल्यांदा अपयश आले तर लगेच हातपाय गळून आता आपल्याला पुढे यश मिळणारच नाही, असे मानून घेण्याची काही गरज नाही.

अपयश एकदा येईल दोनदा-तीनदा येईल. मात्र, कधी ना कधी आपला विजय हा मात्र निश्चितच होणार आहे. त्यामुळे सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असते. समाजामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की, ज्यांनी अतिशय छोट्या भांडवलातून व्यवसाय उभारून कोट्यावधी रुपयाचा आज टर्न ओव्हर केला आहे. याच प्रमाणे शिक्षण क्षेत्राची देखील असेच आहे.

अनेक लोकांना काबाड कष्ट करूनच आपले शिक्षण पूर्ण करावे लागले आहे. मात्र, काही असे लोक असतात की, ज्यांना सगळं काही मिळतं. त्यानंतर ते यश मिळवतातच. बॉलीवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत की, ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यामध्ये ते कार्यरत देखील असतात.

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांचे शिक्षण हे अतिशय कमी झालेले आहे. काही जणांनी पदवी पूर्ण केली आहे, तर काही जणांनी उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. हर्षदा खानविलकर हिने एलएलबी मध्ये उच्च पदवी मिळवली आहे. तर शशांक केतकर याने मास्टर ऑफ इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केलेली आहे, तर आदिनाथ कोठारे याचे शिक्षण एमबीएपर्यंत झालेले आहे.

गौतमी देशपांडे या अभिनेत्रीने देखील इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवलेली आहे. मिलिंद गवळी हा सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या निमित्ताने चर्चेत आहे. त्याचे शिक्षण एम कॉम पर्यंत झालेले आहे. आज आम्ही आपल्याला अभिनेत्री श्वेता पेंडसेच्या बद्दल माहिती देणार आहोत. श्वेता पेंडसे हिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

‘असं सासर सुरेख बाई’ ही तिची मालिका प्रचंड गाजलेली आहे. त्यानंतर कुंकू टिकली या मालिकेत देखील तिने आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पडली होती. श्वेता पेंडसे हिने रसायन शास्त्र मध्ये पदवीत्तर पदवी मिळवलेली आहे. त्यानंतर तिने या विषयात पीएचडी करण्याचे ठरवले. मात्र, ज्या वेळेस पीएचडी ती करत होती, त्यावेळेस ती आठ महिन्यांची गरोदर होती, असे असतानाही तिने मोठ्या जिद्दीने पीएचडी मिळवली.

त्यानंतर नागपूर विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यामध्ये ती आपल्या लहान बाळाला घेऊन गेली होती. यावेळी तिने मुलीला सोबत घेऊनच आपली पदवी हातात घेतली. मुली सोबतचे फोटो खूप मोठ्या प्रमाणात वायरल झाले. श्वेता पेंडसे हिच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आपल्याला श्वेता पेंडसेच्या बद्दल काही सांगायचे असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra