ही अभिनेत्री रिअल लाईफमध्ये आहे ‘PSI’, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री

आपल्या समाजामध्ये अनेक असे लोक आहेत की जे अतिशय गरिबीच्या परिस्थितीमधून वर येऊन आपले करिअर घडवत असतात.अनेक असे लोक आहेत की, ज्यांच्याकडे दोन वेळचे जेवायची देखील नसते. मात्र, अशा परिस्थितीतून आहे ते मार्ग काढून यश संपादन करत असतात. त्यामध्ये आपल्याला अनेक उदाहरण पाहायला मिळतील.
पोलीस दलामध्ये देखील असे अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी अपार कष्ट करून परीक्षा उत्तीर्ण होऊन आज मोठे यश मिळवले आहे. पोलीस दलामध्ये असे देखील अनेक जण असतात की, ज्यांच्यामध्ये कलागुण भरलेले आहेत. मध्यंतरी एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पोलीस अतिशय सुंदर असे गाणे म्हणत होता. त्यानंतर त्याला पोलिस विभागाने देखील प्रोत्साहन दिले.
त्याच प्रमाणे अनेक जण खेळाडू देखील असतात आज आपल्याला या लेखामध्ये औरंगाबादच्या एका तरुणीची कहाणी सांगणार आहोत. ही तरुणी पीएसआय असून तिने अपार कष्ट करून हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे आता ती अभिनेत्री देखील बनणार असल्याचे सांगण्यात येते. या तरुणीचे नाव आहे पल्लवी जाधव. पल्लवी जाधव सध्या महाराष्ट्र पोलीस दलात पीएसआय आहे.
पल्लवी जाधव ही मुळची औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील रहिवासी आहे. पल्लवी जाधव हिचा जन्म एका गरीब कुटुंबांमध्ये झाला. तिचे वडील शेती काम करतात. घरची हलाखीची परिस्थिती होती. त्यामुळे तिच्या दोन्ही बहिणीचे लग्न लवकर करावे लागले. मात्र, पल्लवी ही शिक्षणात हुशार असल्याने तिच्या वडिलांनी तिला शिकून मोठे करायचे ठरवले. इतरांच्या टोमण्यामुळे मात्र ती चांगलीच त्रासुन गेली होती.
अशा परिस्थितीमध्ये वडिलांनी पाच हजार रुपयांचे कर्ज काढून तिला एमपीएससीच्या परीक्षेला बसवले आणि तिने देखील आपल्या वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत एमपीएससी परीक्षा पास केली. तिचे शिक्षण औरंगाबादच्या बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांमध्ये झालेले आहे.पल्लवी जाधव सध्या जालना मध्ये गेल्या पाच वर्षापासून पीएसआय या पदावर कार्यरत आहे. 2020 मध्ये ती मिस इंडिया रनर अप होती.
पल्लवी जाधव ही सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे फॉलॉवर हे लाखांमध्ये आहेत. पल्लवी जाधव हिला अनेक वर्षापासून अभिनयाची आवड आहे. यामुळेच ती आपले फोटो मीडियावर अनेकदा अपलोड करत असते आणि त्याला चाहते देखील खूप लाईक करत असतात. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ती मार्गदर्शन देखील करत असते.
अभिनयाची आवड असल्याने ती आता एका चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येते. लवकरच हैदराबाद कस्टडी नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अधिक माहिती अजून यायची आहे.