“मी कधीही आई होऊ शकत नाही” या मराठमोळ्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिला झालेल्या गंभीर आजारांचा वर्णन केले आहे. 2013 मध्ये सह्याद्री चॅनेलवरील डान्स करून घरी येत असताना पाय इतके सुजले होते की चप्पलशिवाय गाडी चालवावी लागली.
मला वाटलं डान्स करून पाय सुजले असतील. त्यानंतर मी घरी येऊन झोपले. पुढचं पाऊल शूटिंग सुरू होते. मग पुढे मला आईनं मला हॉस्पिटल ला नेले. डॉक्टरने फिजिकल टेस्ट करून एक्स-रे काढायला करून सांगितला. रिपोर्ट बघून म्हणाले, मला वाटलं होतं तेच झालं. एमआरआय आणि ब्लड टेस्ट करायला सांगितल्या.
मी आणि आई फुल टेन्शन मध्ये. मग एमआरआय झाला. पुढे काही वेळातच रिपोर्ट आल्यावर डॉक्टरने आत बोलावलं. डॉक्टरने सांगितले. मेंदूला जाणारी नसा दाबल्या आहेत आणि मणका सरळ झाला आहे, असं डॉक्टरांनी सांगितले. तुमचा ऑक्सीडेंट झाला होता का? कधी जोरात पडला का? असे त्यांनी विचारले?
मी आणि आई पटकन म्हणालो, कधीच नाही. डॉक्टर यांनी औषधं लिहून दिली आणि एक महिना बेडरेस्ट सांगितली. पुढचं पाऊल साठी सुट्टी मिळाली नाही. पण सीन कमी करून सेटवर नंतर झोपता येईल, अशी ॲडजस्टमेंट झाली. रिपोर्ट झाले. माझं वजन वाढत होतं. केस गळत होते. नव्हते मला कळेना. हे सगळे अचानक घडलं.
मला जिम, ट्रेकिंग सगळं बंद करायला सांगितले. यामुळे मला डिप्रेशन आलं. असे करत चार वर्षे गेली. या उपचारानंतर माझ्या मध्ये बदल एवढाच होता की मला त्रास हा कमी होत होता. काही दिवसांनी माझ्या मासिक पाळीचा प्रॉब्लेम सुरू झाला. महिना झाला तरी काही घडेना. या सगळ्यात मी पुढचं पाऊल सोडलं. कोणाला काही सांगता येईना.
माझ्या नेहमीच्या स्त्री रोग तज्ञाने मला काही टेस्ट करायला सांगितल्या. रिपोर्ट आल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले, तेव्हा तिने मला सांगितलं. टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यांनाच मुलंबाळं होतात, असं नाही. सायन्स आहे. त्यावरून आपण प्रयत्न करू शकतो. वगैरे वगैरे.. काय नक्की मी विचारल्यावर त्यावर त्या म्हणाल्या, ते ऐकून मी थोडीशी खचले.
मी तेव्हा हा विचार केला नाही की मूलबाळ होईल न होईल. हे सगळं ऐकून मला खूप टेन्शन आले. मी स्वतः साठी काहीतरी करत होते. रडत न बसता हळूहळू दोन वर्षे गेली. वजन कमी झालं. रिपोर्ट नॉर्मल आले आणि एक दिवस अचानक चकरेचा मोठा झटका आला. ऑलरेडी सहा-सात वर्षे गेली. पुढच आयुष्य यात घालवायचं नाहीये आणि कामाला लागले.
नियमित योग, शाकाहारी आहार, लाइफस्टाइल हे सगळं सुरू केला. मी पॉझिटिव्ह होते, आजही आहे, हा आजार तो बरा होत नाही म्हणे. मग कोवीड वादळ सुरू झालं, अशी गंभीर पोस्ट जुईने महिला दिनाच्या निमित्ताने शेअर करून स्वतःच्या तब्येतीची माहिती दिली. शिवाय ती आता सगळ्यातून सावरत आहे.
एकूणच काय तर जुई गडकरी ही भविष्यामध्ये कधीही आई होऊ शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. जुईच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.