हनुमान जयंतीपासून ‘या’ राशी होतील बलाढ्य धनवान? शुक्राच्या चांदण्याने मिळू शकते नशीबाला कलाटणी

हनुमान जयंतीपासून ‘या’ राशी होतील बलाढ्य धनवान? शुक्राच्या चांदण्याने मिळू शकते नशीबाला कलाटणी

चैत्र महिन्यात रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा केल्यानंतर आता देशभरात ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. भगवान हनुमान यांचा जन्म या दिवशी झाल्याचं मानलं जातं. या दिवशी हनुमान चालिसा आणि सुंदरकांड यांची पारायण केल्यामुळे बजरंगबलीचा आशीर्वाद मिळतो अशी अनेकांची श्रद्धा आहे.

हनुमान हे सर्व वाईट शक्तींचा नाश करतात असंही मानलं जाते. अशातच आता हनुमान जयंती दिवशी शुक्र ग्रह आपली राशी बदलून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे गुरू आणि शुक्राच्या स्थितीमुळे लक्ष्मी योग तयार होणार असल्यामुळे यंदाची हनुमान जयंती अत्यंत शुभ मानली जात आहे. तर ही हनुमान जयंती कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे ते जाणून घेऊया.

मेष- ज्योतिष शास्त्रानुसार, हनुमान जयंतीच्या दिवशी मेष राशीतील लोकांना आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते, शिवाय त्यांना अचानक पैसे मिळू शकतो. या राशीला व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणीही खूप लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांच्या अनेक समस्या दूर होऊन मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी –मिथुन राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंतीचा दिवस लाभदायक ठरु शकतो. हनुमानांच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना धनप्राप्ती होऊ शकते. शिवाय या काळात करिअरशी संबंधित लोकांना नोकरी किंवा पदोन्नतीच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांनाही या काळात विशेष लाभ होऊ शकतो. शिवाय जे नवीन व्यवसाय सुरू करणार आहेत त्यांनाही या काळात फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

सिंह- सिंह राशीच्या लोकांना हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांच्या करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. नोकरदार वर्गाच्या प्रमोशनचीही शक्यता आहे. या काळात तुम्हाला विविध क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. शिवाय या काळात तुम्हाला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो ज्यामुळे तुमच्या व्यवसायातही वाढ होऊ शकते.

वृश्चिक –भगवान हनुमानजींच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या राशीच्या लोकांना शिक्षणात यश आणि नोकरीत प्रगतीच्या नवीन संधी होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतं तर करिअरमध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात.

Team BM