‘हम साथ साथ है’मधील ही चिमुरडी आता झालीय इतकी मोठी, लेटेस्ट फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

‘हम साथ साथ है’मधील ही चिमुरडी आता झालीय इतकी मोठी, लेटेस्ट फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अशाच एका बॉलिवूडमधील बालकलाकारबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान, सैफ अली खान आणि करिश्मा कपूर यांचा ‘हम साथ साथ है’ (Hum Saath Saath Hain) चित्रपटत सलमानला मामा मामा बोलणारी छोटी मुलगी आठवतेय ना. या मुलीनं या चित्रपटात राधिकाची भूमिका साकारली आहे. आता ही मुलगी खूप मोठी झाली असून आता ती खूप ग्लॅमरस व बोल्ड दिसते. या मुलीचं नाव आहे जोया अफरोज.

जोया अफरोजनं हम साथ साथ है चित्रपटाव्यतिरिक्त काही सिनेमात व मालिकामध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. तसेच काही चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली आहे.

जोया २५ वर्षांची असून तिचा जन्म १० जानेवारी १९९४ साली उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये झाला आहे. तिचे शिक्षण आर एन शाह हायस्कूलमधून झालं असून पुढील शिक्षण मुंबईतील मिठीबाई कॉलेडमध्ये झालं आहे. जोया सुंदरतेसाठी खूप फेमस आहे. तिने कित्येक सौंदर्य स्पर्धेत किताब पटकावला आहे.

१९९९ साली प्रदर्शित झालेला चित्रपट हम साथ साथ हैमध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली. तसेच संत ज्ञानेश्वर, कुछ ना कहो यासारख्या चित्रपटातही ती पहायला मिळाली. २०१४ साली तिने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. एक्सपोझ सिनेमात ती हिमेश रेशमियासोबत झळकली.या चित्रपटाव्यतिरिक्त तिने ‘स्वीटी वेड्स एनआरआई’ चित्रपटातही काम केलं आहे.

Team Beauty Of Maharashtra