गुरुनाथला टक्कर देतोय राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा; ‘या’ क्षेत्रात आहे कार्यरत

गुरुनाथला टक्कर देतोय राधिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा; ‘या’ क्षेत्रात आहे कार्यरत

झी मराठीवरील प्रेक्षकांचा निरोप घेतली मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको. या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकली होती. यातील शनाया हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. परंतु काही कालावधीनंतर मात्र राधिकाने बाजी मारली.

शनया व राधिका या दोघींचा नवरा म्हणजे गुरुनाथ सुभेदार होय. गुरुनाथ सुभेदार चलाखीने शनया व राधिका या दोघींसोबत प्रेमाचे नाटक करत असतो. सुरुवातीला मात्र राधिकाला ही गोष्ट लक्षात येत नाही. जेव्हा राधिका समोर सत्य येते की गुरुनाथ सुभेदार हा शनयाशी प्रेम करतो, माझ्याशी नाही.

त्यानंतर राधिका मात्र तिचा मार्ग निवडते आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते. या तिला तिचे सासू-सासरे अर्थात गुरुनाथ चे आई वडील मदत करतात. एक यशस्वी उद्योजक महिला अशी राधिकाची नंतर नवीन ओळख निर्माण होते. ती गरजू महिलांना आपल्या राधिका मसाले या कंपनीत नोकरीला ठेवते.

कंपनीतील प्रत्येक कामगारांना ती आपल्या घरातील सदस्य मानत असते. एकीकडे राधिका दिवसेंदिवस प्रगती करत असते, तर दुसरीकडे गुरुनाथचे मात्र भाग्य साथ देत नाही आणि तो दिवसेंदिवस हालअपेष्टा सहन करत जातो. नंतर शनाया देखील गुरुनाथची मदत करत नाही. तिला गुरुनाथ कसल्या स्वभावाचा आहे. हे लक्षात येते.

अगदी स्वार्थी माणूस असल्यामुळे शनाया देखील गुरुनाथची सोबत सोडून राधिकाशी हात मिळवणी करते. या मालिकेमध्ये गुरुनाथ सुभेदार याची भूमिका अभिजीत खांडकेकर याने साकारली आहे, तर राधिकाची भूमिका अनिता दाते हिने साकारली आहे.

मालिकेमध्ये राधिका नवरा म्हणून गुरुनाथ यशस्वी झाला असला तरी राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील नवरा मात्र अगदी यशस्वी कला विश्वाशी निगडीत आहे. राधिकाची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री म्हणजे अनिता दाते केळकर अनिताला राधिका ही मध्यवर्ती भूमिका करत असताना प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम केले आहे आणि तिची लोकप्रियताही माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत पासून वाढली आहे.

अनिताची प्रोफेशनल जीवनशैली तसेच खाजगी जीवनशैली देखील चर्चेत आहे. अनिताच्या पती विषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे .त्यामुळे अनिता चा नवरा काय करतो तो कसा दिसतो याविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. अनिताच्या पतीचे नाव चिन्मय केळकर असे आहे. या दोघांचे लव मॅरेज झाले आहे.

अनिता व चिन्मय या दोघांची सगळ्यात पहिल्यांदा भेट ललित कला केंद्र येथे झाली. यानंतर या दोघांच्या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तो कला विश्वास निगडित आहे. चिन्मयला फोटोग्राफीची विशेष आवड आहे. चिन्मय सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो हे विशेष.

Team Beauty Of Maharashtra