गुरुदेव गोचर करून ‘या’ ५ राशींच्या नशिबाला देणार कलाटणी? ‘या’ दिवसापासून अमाप धनलाभाची संधी

देवगुरु बृहस्पस्ती १२ वर्षांनी मेष राशीत गोचर प्रारंभ करण्यास सज्ज झाले आहेत. आजपासून ३२ दिवसांनी म्हणजेच २२ एप्रिल २०२३ ला गुरु ग्रह मेष राशीत स्वघरी परतणार आहे. सकाळी ४ वाजून ४२ मिनिटांनी गुरु ग्रह मीन राशीतून निघून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यानंतर १ मे २०२३ पर्यंत गुरु मेष राशीत असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार देवगुरु हे ज्ञान, शिक्षण, दान व संततीचे कारक मानले जातात. गुरु गोचराचा प्रभाव हा सर्व राशींवर होऊ शकतो. अशातच २२ एप्रिलला गुरु गोचर होण्याआधीच गुरु भ्रमण सुरु होऊन विपरीत राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाने पाच राशींवर अत्यंत शुभ प्रभाव होऊ शकतो, या राशी कोणत्या व त्यांना काय लाभ होणार हे जाणून घेऊया…
विपरीत राजयोगाने ‘या’ ५ राशी होतील श्रीमंत?
मिथुन रास (Gemini Zodiac)
गुरु गोचर होण्याआधी विपरित राजयोग बनून मिथुन राशीचा शुभ काळ सुरु होऊ शकतो. याकाळात आपल्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. धनलाभ होताना तुमचा मान- सन्मान सुद्धा प्रचंड वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचे योग आहेत.
तूळ (Libra Zodiac)
देवगुरु बृहस्पती गोचर करण्याआधी तूळ राशीच्या मंडळींना प्रचंड लाभ अनुभवता येऊ शकतो. येत्या महिनाभरात आपली अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. तुमच्या प्रलंबित कामांमधून प्रगतीचे दार उघडू शकते. तुमचे आर्थिक क्षेत्र रुंदावण्याची सुद्धा शक्यता आहे.
कर्क (Cancer Zodiac)
गुरु गोचर झाल्याने महिन्याभरात तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो. लाइफ पार्टनरच्या माध्यमातून पैसा मिळू शकतो. तसेच, बेरोजगार लोकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. दुसरीकडे, नोकरी व्यवसायातील लोकांना मार्चमध्ये पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळू शकते.
कन्या (Virgo Zodiac)
मेष राशीमध्ये गुरुचे गोचर होताच याचा शुभ प्रभाव कन्या राशीवर होऊ शकतो. याकाळात तुम्हाला नव्या कामाची सुरुवात करता येऊ शकते. तुम्हाला वैवाहिक आयुष्यात एक पाऊल पुढे टाकण्याची संधी मिळू शकते. तुमचा मान- सन्मान वाढून मानसिक ताण कमी होऊ शकतो.
मीन (Pisces Zodiac)
गुरु गोचराने तयार होणारा विपरीत राजयोग मीन राशीच्या मंडळींसाठी सोन्याहून पिवळा सुखाचा काळ घेऊन येऊ शकतो. गुरुचे मीन राशीतून मेष राशीत गोचर होताना काही प्रमाणात मीन राशीत काहीसा प्रभाव कायम राहू शकतो. तुम्हाला नियमित कामाशिवाय अन्य माध्यमातून सुद्धा धनलाभ होऊ शकतो.