गुढीपाडव्याच्या आधी ‘या’ ३ राशींना लक्ष्मी करणार श्रीमंत? नववर्षात मंगळ ‘या’ रूपात देईल धनलाभाची संधी

गुढीपाडव्याच्या आधी ‘या’ ३ राशींना लक्ष्मी करणार श्रीमंत? नववर्षात मंगळ ‘या’ रूपात देईल धनलाभाची संधी

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर करून, मार्गी होऊन, वक्री होऊन १२ राशींवर प्रभाव पडत असतो. ग्रहांच्या राशी व नक्षत्र परिवर्तनाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव आपल्याला कमी अधिक फरकाने दिसून येतो. येत्या १३ मार्चला शौर्य व साहसाचे कारक मंगळ ग्रह हे मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

तब्बल २ महिन्यांनी मंगळ आपल्या राशीतून परिवर्तन करणार आहे. यापूर्वी १३ जानेवारीला मंगळ वृषभ राशीत स्थिर झाले होते. मंगळ गोचराने काही राशींना भाग्योदयाचे योग आहेत. या राशींना मोठा धनलाभ होण्याची संधी आहे तसेच करिअरमध्ये सुद्धा प्रगतीचे योग आहेत. या राशी कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होणार हे सविस्तर जाणून घेऊयात..

वृषभ (Taurus Zodiac)
मंगळ ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत मार्गी होणार आहेत. त्यामुळे गोचराच्या नंतरही मंगळाचा शुभ प्रभाव काही अंशी वृषभ राशीत कायमी असणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला प्रॉपर्टीच्या खरेदी- विक्रीतून धनलाभाची प्रबळ संधी मिळणार आहे. व्यवसायात सुद्धा मोठी प्रगती होऊ शकते. आपल्याला वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. येत्या काळात आपल्या उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्ही जर नवीन क्षेत्रात पैसे गुंतवू इच्छित असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य पाऊलं उचलण्याची हीच वेळ आहे.

कन्या (Kanya Zodiac)
मंगळ ग्रहाचे गोचर कन्या राशीच्या मंडळींसाठी शुभ व लाभदायक काळ सुरु होऊ शकतो. मंगळ ग्रह आपल्या राशीच्या कर्म भावी स्थिर होणार आहेत. यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना लवकरच आनंदाची बातमी व मोठी संधी मिळू शकते. तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा प्रगतीचे योग आहेत. आपल्याला वाडवडिलांच्या गुंतवणुकीचा मोठा लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवून काम करावे लागेल. तुम्हाला लवकरच पदोन्नती व पगारवाढीचा सुद्धा योग आहेत यासाठी तुमच्या नव्या कल्पना कामी येतील.

तूळ राशि (Tula Zodiac)
मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन हे तूळ राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते, मंगळ ग्रह आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत भाग्य स्थानी स्थिर होणार आहे. याकाळात आपल्याला भाग्याची साथ लाभू शकते. परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या काळात मनाप्रमाणे काम व प्रगतीचे योग आहेत. आपली प्रलंबित कामे पूर्ण होऊन यातूनच धनलाभाची संधी मिळू शकते. आपल्याला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह जुळवून काम करावे लागेल. कोर्टाच्या कामात निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो.

Team BM