आज होत आहे नविन वर्षारंभ, गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

आज होत आहे नविन वर्षारंभ, गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

आज सूर्य दिवसरात्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. आजपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. तसेच वर्षाचा राजा व प्रधान यातही बदल होत आहे. चंद्र दिवस-रात्र मेष राशीत असेल. ग्रहांचे हे परिवर्तन तुमच्या राशीला कशा प्रकारे प्रभावित करेल, कोणत्या बाबतीत भाग्यशाली असाल ते जाणून घ्या.

सूर्य दिवसरात्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. आजपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. तसेच वर्षाचा राजा व प्रधान यातही बदल होत आहे. चंद्र दिवस-रात्र मेष राशीत असेल. ग्रहांचे हे परिवर्तन तुमच्या राशीला कशा प्रकारे प्रभावित करेल, कोणत्या बाबतीत भाग्यशाली असाल ते जाणून घ्या.

मेष : ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना तुमच्या टीमवर्क चे महत्व समजेल व ते मदतीसाठी पुढे येतील. बऱ्याच काळापासून चालू असलेला कायदेविषयक विवाद आज समाप्त होईल. चांगली माणसे तुम्हाला प्रेरणा देतील. त्यामुळे तुम्हाला आनंद अनुभवता येईल. संध्याकाळी बाहेर जाऊ शकता. व्यवसायात लाभाचे योग आहेत. ९७% नशिबाची साथ आहे.

वृषभ : आज उत्साहाने केलेल्या कामात नक्कीच यश मिळेल. दुपारनंतर सगळी कामे पूर्ण होताना दिसून येतील. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात एखादी डील करण्यापूर्वी सर्व बाबी काळजीपूर्वक तपासा. ८१% नशिबाची साथ आहे.

मिथुन : आर्थिक निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे. येणाऱ्या २-३ दिवसात वेळ मिळणार नाही. घरात मंगल कार्याची चर्चा होऊ शकते. जुने प्रेम परत मिळू शकते. संध्याकाळी खरेदीसाठी कुटुंबाबरोबर जाण्याची योजना असेल. ८३% नशिबाची साथ आहे.

कर्क : तुमच्यापैकी काहींचे मन ध्यानधारणा व योगा मध्ये असेल. एखाद्या धार्मिक ठिकाणी यात्रेचा योग आहे. बौद्धिक कामात तुम्हाला यश मिळू शकते. एखादी नवीन डील तुमच्या अटी-शर्तींवर मंजूर होईल. परंतू ही गोष्ट कोणालाही सांगू नका. ७५% नशिबाची साथ आहे.

सिंह : जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यामुळे जास्त काम करावे लागले तरी घरच्यांकडून सहकार्य मिळेल. प्रमोशन व पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. घरातील लहानांना वेळ देणे गरजेचे आहे. ७८% नशिबाची साथ आहे.

कन्या : कलात्मक कामात आवड निर्माण होईल. इकडच्या-तिकडच्या गप्पा करण्यापेक्षा तुमच्या छंदाला वेळ द्या. त्याला पुढे न्यायचा विचार करा. त्यामार्फत पैसे कमावण्याची संधी आहे. पैशांची समस्या उद्भवेल परंतु संध्याकाळपर्यंत त्याचे निराकरण होईल. कोणी उधार मागत असेल तर त्याला तुमची परिस्थिती सांगा. ७७% नशिबाची साथ आहे.

तूळ : घरातील लोकांचे आरोग्य चांगले असेल. मन व बुद्धीच्या संतुलानाने यश मिळेल. अकाउंटच्या फाईल्स तयार ठेवा, केव्हाही गरज पडू शकते. तुमच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष ठेवा. तुमच्या चांगल्या वर्तनाने तुम्ही त्यांचे मन जिंकू शकता. ८४% नशिबाची साथ आहे.

वृश्चिक : तुमच्या कल्पनांना कृतीत आणण्याची संधी मिळेल. राजकारणात आवड वाढेल. एका विशेष व्यक्तीसाठी संध्याकाळी खर्च करावा लागू शकतो. परंतू प्रत्येक वेळी जमा-खर्चाचा हिशोब करण्यापेक्षा कधीतरी नातेसंबंधांना महत्व देणे चांगले असेल. ७७% नशिबाची साथ आहे.

धनू : ऑफिसमध्ये खूप काम असेल. धावपळ केल्यानंतर त्याचा फायदा नक्की मिळेल. स्वतःच्या प्रतिभेवर विश्वास ठेवा आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी दिखावा करण्याची गरज नसते हे लक्षात घ्या. तुमच्या प्रियकर-प्रेयसीचा मूड आज चांगला असेल. ६९% नशिबाची साथ आहे.

मकर : घरातील दैनंदिन कामे करण्यात दिवस खर्ची पडेल. पण एकानंतर एक कामे पूर्ण केल्याने मन संतुष्ट होईल. कायदेविषयक कागदपत्रांवर सही करण्याआधी ते काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. ७३% नशिबाची साथ आहे.

कुंभ : सकाळपासून चांगल्या बातमीच्या प्रतीक्षेत असाल. संध्याकाळ पर्यंत तुमची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. जवळपासच्या यात्रेचा योग आहे. नवीन लोकांशी संबंध निर्माण करणे तुमच्यासाठी चांगले असेल. व्यवसायाबरोबर प्रेमाचे डील सुद्धा फायनल होऊ शकते. कार्यक्षत्रात तुमचा सन्मान वाढेल. ९८% नशिबाची साथ आहे.

मीन : दिवसाची सुरुवात धीम्या गतीने होईल. सकाळी ज्या गोष्टीची काळजी वाटेल तीच गोष्ट दुपारनंतर आनंद देईल. ऑफिसमध्ये तुमचे स्थान बनवण्यासाठी विचारपूर्वक व्यवहार करा. बुद्धीशी निगडीत परिणाम संध्याकाळपर्यंत दिसून येतील. आरोग्याची काळजी घ्या. ७९% नशिबाची साथ आहे.

Team Beauty Of Maharashtra