आज आहे चंद्रग्रहण, जाणून घ्या आपल्या शहरातील सुतकाचा मुहूर्त….

वैशाख पौर्णिमा ही २६ मे रोजी असून हे वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण खग्रास असेल आणि त्याला सुतक देखील असेल. धर्मग्रंथात ग्रहणाचे महत्त्व सांगितले आहे. यावेळी देवी-देवतांच्या मूर्तीला स्पर्शही केला जात नाही. या काळात मानसिक जप करणे शुभ आणि अधिक फायदेशीर मानले जाते.
धर्मग्रंथानुसार चंद्रग्रहणाच्या सुतकाबद्दल बोलताना, चंद्रग्रहणातील सूर्यग्रहण ग्रहण सुरू होण्याच्या १० तासापूर्वी सुरू होते. ग्रहण संपताच ग्रहणांचे सुतक देखील संपते. या शास्त्रीय घडामोडीनुसार चंद्रग्रहणाची सुरुवात दुपारी ०३ वाजून १५ मिनिटांनी सुरू होत असल्याने त्याचे सुतक २६ मे रोजी सकाळी ०६ वाजून १५ मिनिटांन सुरू होईल.
परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की या चंद्रग्रहणाचे सुतक देशाच्या बहुतेक भागात वैध ठरणार नाही. याचे कारण म्हणजे हे चंद्रग्रहण देशाच्या काही भागात दिसणार आहे तर काही भागात दिसणार नाही. ज्या ठिकाणी चंद्रग्रहण दिसेल तेथे लोकांना सूतक आणि ग्रहणाची परंपरा पाळावी लागेल, इतर भागांमध्ये चंद्रग्रहणाशी संबंधित कोणत्याही नियमांचा आणि सुतकाचा विचार करण्याची गरज नाही.
भारतात चंद्रग्रहण काही काळ आंशिक स्वरुपात दिसेल कारण जेव्हा चंद्र दिसेल तेव्हा ग्रहण देखील संपेल. अशाप्रकारे, सुतकाचा परिणाम केवळ आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मणिपूर, मिझोरम, पश्चिम बंगाल, तसेच ओरिसा आणि झारखंडच्या काही भागांत दिसून येईल.
त्यामुळे चंद्रग्रहणाचा विचार करता ज्या भागात सूर्यास्त ०६ वाजून १५ मिनिटांनी होईल त्या भागात ग्रहण वैध असेल. कारण येथे चंद्रग्रहण दिसेल.
कोलकातामध्ये चंद्रग्रहणाचा सुतक वेळ – सूर्यास्ताची वेळ ०६ वाजून १५ मिनिट त्यामळे सुतक वैध असेल.
दिल्लीमध्ये चंद्रग्रहणाचा सुतक वेळ – सूर्यास्त संध्याकाळी ०७ वाजून १२ मिनिटांनी होईल, त्यामुळे सूतक वैध ठरणार नाही.
मुंबईत चंद्रग्रहणाचा सुतक वेळ – सायंकाळी ०७ वाजून १० मिनिटांनी सूर्यास्त होईल, त्यामुळे सुतक वैध ठरणार नाही.
चेन्नईमध्ये चंद्रग्रहणाचा सुतक वेळ – सूर्यास्त संध्याकाळी साडेसहा वाजता होईल म्हणून सुतक वैध ठरणार नाही.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.