गोकुळाष्टमी कधी आहे? जाणून घ्या, व्रताचरण पद्धत, महत्त्व व मान्यता

गोकुळाष्टमी कधी आहे? जाणून घ्या, व्रताचरण पद्धत, महत्त्व व मान्यता

श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेध लागतात, ते गोकुळाष्टमीचे. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. यावेळी ३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. ३० ऑगस्ट रोजी देशभरात कृष्णा जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाईल आणि भक्त भगवानांच्या जयंतीच्या आनंदात तल्लीन होतील. जन्माष्टमीचा शुभ काळ आणि गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव कधी साजरा केला जाईल जाणून घ्या…

जन्माष्टमी- दरवर्षी जन्माष्टमीचे व्रत २ दिवस केले जाते. पहिल्या दिवशी शैव समाजातील लोक उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी वैष्णव समाजाचे लोक उपवास करतात. व्यापकपणे सांगायचे झाले तर पहिल्या दिवसाचे उपवास ऋषी, संत समाजाचे लोक करतात आणि दुसऱ्या दिवसाचे उपवास इतर लोक करतात.

पण यावेळी सर्वच जण एकाच दिवशी म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचे व्रत करतील. असे म्हणतात की यावेळी ३० ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर, म्हणजे रात्री २ वाजल्यानंतर, नवमी आयोजित केली जाईल. म्हणून, यावेळी सर्व समाजातील लोकांनी ३० ऑगस्ट रोजी उपवास करणे सर्वोत्तम आणि योग्य ठरेल. त्याच दिवशी गोकुळाष्टमी आणि नंदोत्सवही साजरा केला जाईल.

जन्माष्टमी शुभ मुहूर्त- श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी यंदा मंगळवार, ११ ऑगस्ट २०२० रोजी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते.

श्रीकृष्ण जन्माष्टमीला पूजनाचा शुभ मुहूर्त ३० ऑगस्टला रात्री ११ वाजून ५९ मिनिटे तर १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहिल.
श्रावण वद्य अष्टमी प्रारंभ – २९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्रौ ११ वाजून २५ मिनिटे. श्रावण वद्य अष्टमी समाप्ती – ३० ऑगस्ट २०२१ मध्यरात्री २ वाजून १ मिनिटे.

जन्माष्टमीचे व्रत कसे करावे- जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे.

गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला.

हा कृष्णाला फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. या दिवशी महाराष्ट्रात गोपाळकाल्याच्या निमीत्ताने दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या परंपरेने जन्माष्टमी साजरी केली जाते.

Team Beauty Of Maharashtra