घटस्फोटाच्या चर्चेत अभिनेत्याने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोंची रंगली चर्चा

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक असे अभिनेते आहेत की, जे नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील चर्चेत असतात. मराठी अभिनेत्यांमध्ये सध्या सिद्धार्थ जाधव हा एक असा अभिनेता आहे की, तो देखील खूपच चर्चेत आलेला आहे.
सिद्धार्थ जाधव याने काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले. नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सिद्धार्थ जाधव याने काही वर्षांपूर्वी कोंबडी पळाली या गाण्यामध्ये धम्माल असा डान्स केला होता.
या चित्रपटाचे नाव जत्रा असे होते. जत्रा चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले होते. सिद्धार्थ जाधव हा केदार शिंदे यांच्या अतिशय जवळचा मानला जातो. त्यामुळे अनेक चित्रपटात तो त्यांच्या सोबत दिसत असतो. सिद्धार्थ जाधव आता दे धक्काच्या दुसऱ्या भागात देखील दिसणार आहे. सुदेश मांजरेकर आणि महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
दे धक्का चा पहिला भाग प्रचंड लोकप्रिय झाला होता. पहिल्या भागामध्ये मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम यांच्यासारख्या कलाकारांच्या भूमिका होत्या. मेधा मांजरेकर यांनी देखील या चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.
त्यामुळे सिद्धार्थ जाधव याची ऐतिहासिक भूमिका या चित्रपटातील आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधव याच्या खाजगी आयुष्यामध्ये सध्या वादळ उठले याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. सिद्धार्थ जाधव हा आपल्या पत्नीसोबत काही दिवसापूर्वीच दुबई ट्रिप वर गेला होता. यावेळेस त्याच्यासोबत मुलं देखील होते.
मुलांसोबत त्यांनी अतिशय मोठ्या गाडीमध्ये फोटो सेशन देखील केले होते. मात्र, यावेळेस त्याने आपल्या पत्नी सोबतचे फोटो काही सोशल मीडियावर शेअर केले नाही. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसल आहे, अशी चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगली होती. सिद्धार्थ जाधव याने काही वर्षापूर्वी तृप्ती सोबत लग्न केले आहे.
तृप्ती ही व्यवसायाने पत्रकार होती. या दोघांची ओळख एका नाटकाच्या निमित्ताने झाली होती. त्यानंतर सिद्धार्थ जाधव याने तिला प्रपोज केले आणि दोघांनी लग्न केले. मात्र, काही दिवसापूर्वी तृप्ती हिने आपल्या आडनावा समोरचे जाधव हटवले आहे, त्यामुळे या दोघांचा घटस्फोट झाला की काय अशी चर्चा देखील रंगली आहे.
मात्र, आता सिद्धार्थ जाधव याने आपल्या मुलीचा वाढदिवस अतिशय थाटामाटात साजरा केला आहे. मुलीच्या वाढदिवसाच्या फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याची पत्नी देखील दिसत आहे. त्यामुळे आता या दोघांनी घटस्फोट घेतला की नाही याबाबत काहीही सांगता येत नाही.