घरातून बाहेर पडताय आणि या गोष्टी दिसताय, तर समजून जा तुम्ही धनवान होणार

घरातून बाहेर पडताय आणि या गोष्टी दिसताय, तर समजून जा तुम्ही धनवान होणार

ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, आपल्या दैनंदिन जीवनात कित्येकदा अश्या काही घटना घडतात ज्यामुळे कधी आपल्याला फायदा होतो तर कधी नुकसान. धावपळीच्या या आयुष्यात आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहूनही न पाहिल्यासारख्या करतो कारण आपल्या डोक्यात सतत विचारांचे द्वंद्व सुरू असते. त्यामुळे आपण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी नीटपणे समजून घेऊ शकत नाही.

शास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला अश्याकाही गोष्टी दिसल्या तर त्या तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतात तसेच तुम्हाला धनवानही बनवू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला आपले डोके शांत ठेवण्याची गरज आहे. शास्त्रामध्ये अश्या काही संकेतांचा उल्लेख केलेला आहे ज्यामुळे तुमचे नशीब चमकू शकते.चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टींविषयी…

घरातील समस्यां होतील नाहीश्या- शकुनशास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला शंख,घंटा,स्वस्तिक चिन्ह,नाणे किंवा घोड्याची नाल दिसली तर हा तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत आहे. या वस्तू वाटेत दिसल्यास त्या उचलून स्वतःजवळ ठेवून घ्या कारण या वस्तू तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत.या वस्तुंना तुमच्या घराच्या अंगणात किंवा बागेत नेऊन पुरा. जर ते शक्य नसेल तर घरातील देव्हाऱ्यात ठेवा. असे मानले जाते की यामुळे घरातील समस्या नष्ट होतात आणि सर्व कामात नशिबाची उत्तम साथ तुम्हाला लाभते.

धनप्राप्तीचे योग तयार होतील- घरातून बाहेर पडल्यावर जर तुम्हाला ऊसाचा ढीग किंवा गाय दिसली व गायीचा आवाज ऐकू आला तर हा शुभ संकेत मानावा. याचा अर्थ तुम्ही ज्या कामासाठी घराबाहेर जात आहात त्या कामात तुम्हाला नक्की यश मिळेल. सोबतच धनप्राप्तीचे योगही तयार होतील. तसेच तुमच्या वाटेत कोणत्याही प्रकारचे अडथळे किंवा समस्या निर्माण होणार नाहीत.

अचानक होईल धनप्राप्ती- जर तुम्ही पैश्यांची देवाणघेवाण करत असाल व दुसऱ्यांना पैसे देताना तुमच्या हातून पैसे खाली जमिनीवर पडले तर हा एक शुभ संकेत मानला जातो. शकुन शास्त्रानुसार तुम्हाला तुमच्या योजनेत लाभ मिळेल आणि अचानक धनप्राप्ती होईल असा याचा अर्थ घेतला जातो. तसेच नोकरी व व्यापारातून तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल असेही समजावे.

नशिबाची साथ नेहमी लाभेल- जर तुम्ही रस्त्यात असाल आणि एखादं लहान मूल तुमच्याजवळ येऊन तुम्हाला पैसे देऊ लागलं तर हा एक शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या न कोणत्या रुपात धनलाभ होईल आणि भाग्याची साथही तुम्हाला लाभेल. सोबतच तुमच्या आसपास सकारात्मक ऊर्जेचा संचारही होईल व अडकलेले पैसेही परत मिळतील.

धनलाभ होण्याचे संकेत- जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि रस्त्यात तुम्हाला पिसारा फुलवलेला मोर दिसला तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो.याचा अर्थ असा होतो की,तुमचे काम लवकरच पूर्ण होईल आणि धनलाभही होईल.जर रस्त्यात तुम्हाला एखादा सफाई कामगार दिसला तर हादेखील एक चांगला संकेत आहे.असे झाल्यास धनसबंधीत कार्यात तुम्हाला यशप्राप्ती होण्याची शक्यता वाढते असे म्हटले जाते.

आई लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद- घरातून बाहेर पडताना जर एखादी लहान मुलगी हसताना दिसली किंवा पाण्याने भरलेला हंडा घेऊन जाताना एखादी मुलगी दिसली तर हा एक शुभ संकेत मानला जातो.तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न असल्याचे हे संकेत आहेत.तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा आहे व तिचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे असा त्याचा अर्थ होतो.तुमच्या धन संबंधित सर्व समस्या लवकरच नाहीश्या होतील असे समजावे.

Team Beauty Of Maharashtra