२०२३मध्ये ‘या’ तीन राशी अनुभवणार गजलक्ष्मी योग; विवाह, घर खरेदी सर्व स्वप्न होणार साकार!

२०२३मध्ये ‘या’ तीन राशी अनुभवणार गजलक्ष्मी योग; विवाह, घर खरेदी सर्व स्वप्न होणार साकार!

ज्योतिषशास्त्रात गुरु बृहस्पती यांना देवतांचे गुरु म्हटले आहे. बृहस्पति हा शुभ, विवाह, सुख आणि समृद्धीचा कारक आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु शुभ असतो त्यांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळते. त्याच्या जीवनात सुख-समृद्धीची कधीच कमतरता नसते. बृहस्पतिच्या शुभयोगामुळे वैवाहिक जीवन सुखी होते. २०२३ मध्ये गुरु ग्रहाचे संक्रमण होणार आहे.

२२ एप्रिल २०२३ रोजी बृहस्पति मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल. बृहस्पतिच्या राशी बदलामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल, जो काही लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होईल. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप आर्थिक प्रगती होईल. जीवनात सुख-समृद्धी येईल. अविवाहित लोकांचे लग्न होईल. घर, वाहन खरेदी तसेच अन्य भौतीक सुखांची पूर्तता होईल. चला जाणून घेऊया की २०२३ मध्ये कोणत्या राशीना गुरूचे पाठबळ मिळणार आहे.

गुरु ग्रहाच्या संक्रमणाने तयार झालेला गजलक्ष्मी राजयोग मेष राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. कारण बृहस्पति आपली राशी बदलून मेष राशीत प्रवेश करेल. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना उच्च पद, मोठे सॅलरी पॅकेज मिळू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांनाही फायदा होईल. मुलांकडून कोणतीही चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. एखादे जुने वादग्रस्त प्रकरण मिटेल आणि निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.

मिथुन राशीच्या लोकांना गुरूच्या राशीत बदलामुळे खूप फायदा होईल. नशीब तुमची साथ देईल. उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. जोखमीची गुंतवणूकही नफा देऊ शकते. नोकरदारांना बढती-वाढ मिळू शकते. व्यावसायिकांचे मोठे सौदे निश्चित होऊ शकतात.

गुरुचे संक्रमण धनु राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ देईल. विशेषत: व्यवसायात मोठे यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठीही काळ चांगला राहील. वैवाहिक संबंध चांगले होतील. अविवाहित लोक विवाह करू शकतात. परदेशात जाऊ शकतात. राहिलेल्या स्वप्नांना चालना मिळेल. उत्कर्षाचा काळ असेल.

Team BM