‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत साधीभोळी दिसणारी कीर्ती रिअल लाईफ मध्ये आहे खुपचं हॉट व ग्लॅमरस, बघा फोटो !

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत साधीभोळी दिसणारी कीर्ती रिअल लाईफ मध्ये आहे खुपचं हॉट व ग्लॅमरस, बघा फोटो !

फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सध्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये शुभम आणि कीर्ती या दोघांची प्रेम कहाणी आता हळू हळू पुढे सरकत आहे. फुलला सुगंध मातीचा ही मालिका एका हिंदी मालिकेवरुन प्रेरित असल्याचे सांगण्यात येते. शुभम याचा व्यवसाय असतो. मात्र तरी देखील त्याचे आणि कीर्तीचे प्रेम संबंध फुलतात.

मात्र, आता लग्न कसे करायचे हा प्रश्न त्यांना पडतो. त्या वेळी जीजी अक्का या मध्यस्थी करून जामखेडकर कुटुंबीयांना याबाबत माहिती देतात. त्यानंतर त्या दोघांचे लग्न होते. त्यानंतर कीर्ती ही आता आयपीएस ट्रेनिंगसाठी हैदराबाद येथे जाते. आयपीएस ट्रेनिंग साठी गेल्यानंतर तिला तेथील पोलीस अधिकारी लांब केसांमुळे बोलतात आणि तिला केस कापायला सांगतात.

मात्र, कीर्ती केस न कपण्यावर ठाम राहते. ट्रेनिंग सुरू असतानाच कीर्ती हिला अचानक अस्वस्थ वाटायला लागते आणि चक्कर येते. त्यानंतर ती डॉक्टरांना दाखवते. तिला प्रेग्नेंसी असल्याची शंका येते. त्यामुळे ती टेस्ट करते. सुरुवातीला तिची टेस्ट ही पॉझिटिव्ह येते. त्यामुळे ती आनंदाने ही बाब शुभम याला सांगते. शुभम आनंदात ही बाब आपल्या कुटुंबीयांना सांगतो. मात्र, दोन दिवसानंतर कीर्ती पुन्हा एकदा टेस्ट करते.

तर ती टेस्ट निगेटिव्ह येते. त्यानंतर पुन्हा एकदा कीर्ती शुभम याला ही माहिती देते. शुभम नाराज होतो आणि कुटुंबीयही नाराज होतात. मात्र, असे असले तरी आपली पत्नी आता पोलिस अधिकारी होणार या खुशीत तो असतो. अशी ही मालिका आता हळूहळू पुढे सरकत आहे. या मालिकेत कीर्ती ची भूमिका समृद्धी केळकर या अभिनेत्रीने साकारलेली आहे. समृद्धी केळकर ही अतिशय उत्कृष्ट अशी अभिनेत्री आहे.

लोभस, सुंदर आणि वर्णन करावे तेवढे कमी असे तिचे रूप आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा सक्रीय असते. आपल्या चाहत्यांशी सोशल मीडिया वरून संवाद देखील साधत असते. चाहते देखील तिला अनेक प्रश्न विचारत असतात. या प्रश्नांचे उत्तर देखील ती आवर्जून देत असते. समृद्धी केळकर ही मूळ ठाण्यातील रहिवासी आहे. तिचा जन्म ठाण्यात झालेला आहे.

तिचे प्राथमिक शिक्षण हे ठाण्यातील सरस्वती सेकंडरी हायस्कूल येथे झाले आहे. त्याचबरोबर तिने आपली बीकॉम मधील पदवी ही वाझे केळकर कॉलेज येथून पूर्ण केले आहे. अभिनयाची आवड असल्याने तिने सुरुवातीला मॉडेलिंग केले. त्यानंतर अनेक जाहिराती देखील केल्या. त्यानंतर ती कलर्स मराठी वर सगळ्यात आधी ‘लक्ष्मी सदैव मंगलंम’ या मालिकेत दिसली होती.

तिची ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर 2017 मध्ये ‘ढोलकीच्या तालावर’ या शो मध्ये देखील ती दिसली होती. या स्पर्धेमध्ये तिची टॉप फाइव्ह डांसर मध्ये निवड झाली होती. त्यानंतर ती सध्या आता ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिची कीर्ती ची भूमिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेत तिच्यासोबत हर्षद अतकरी, भुमिजा पाटील, पल्लवी पटवर्धन आणि इतर कलाकारांच्या भूमिका आहेत.

समृद्धी केळकर ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतेच तिने काही फोटो आपले सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. या फोटोमध्ये ती अधिकच सुंदर आणि खुलून दिसत आहे, तर आपल्याला समृद्धी केळकर आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra