फेब्रुवारीचे २८ दिवस ‘या’ ४ राशींना लक्ष्मी देणार बक्कळ धनलाभ?शनी अस्त होताच प्रचंड श्रीमंतीचे योग

फेब्रुवारीचे २८ दिवस ‘या’ ४ राशींना लक्ष्मी देणार बक्कळ धनलाभ?शनी अस्त होताच प्रचंड श्रीमंतीचे योग

ज्योतिषांच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात बुध, शुक्र व सूर्याचे गोचर होणार आहे. याशिवाय ३१ जानेवारीला शनिदेव अस्त होऊन कुंभ राशीत स्थिर असणार आहेत. पुढील ३३ दिवस शनिदेव अस्त होऊन कायम असतील तर मंगळ ग्रहाची सुद्धा २५ फेब्रुवारीला हालचाल होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर पाहायला मिळतो. यानुसार फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या उलाढाली काही राशींसाठी भाग्योदय घेऊन येणार आहेत. ४ राशींसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत शुभ व लाभदायक ठरू शकतो. येत्या काळात ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभ व प्रगतीचे योग तयार होत आहेत.

फेब्रुवारी २०२३ मध्ये या ४ राशी होणार धनवान?
मेष राशी
व्ययस्थानातील उच्चीचा शुक्र खर्चाचे प्रमाण वाढवेल पण त्यासह मिळकतीचा वेग व प्रवाह सुद्धा वाढू शकतो. रवी मंगळाचा शुभ योग नोकरी व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल. कामातील अडचणींवर मात करण्यासाठी वरिष्ठांची साथ मिळेल. सातत्यपूर्ण प्रयत्न महत्वाचे ! शिक्षण वा कामानिमित्त प्रवास योग येतील. मित्र मंडळी नातेवाईक यांची मदत कराल.

वृषभ राशी
भाग्य स्थान आणि दशम स्थानातील शुक्राचे भ्रमण मनाप्रमाणे यश देण्यास साहाय्यकारी ठरेल. कामकाजात नवी झेप घ्याल. नोकरी व्यवसायासाठी विशेष गुंतवणूक कराल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. एखादे वेळी प्रत्यक्ष परदेशगमन झाले नाही तरी परदेशासंबंधीत कामे, करार करण्याचे योग आहेत. संधीचे सोने कराल. जोडीदारासह वैचारीक चर्चा रंगतील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ मंडळींचा आधार घ्याल. रक्तातील घटकांचे प्रमाण बिघडेल. आहारावर नियंत्रण आवश्यक !

कन्या राशी
विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. षष्ठ स्थानातील शनी, रवी, शुक्राच्या भ्रमणामुळे आर्थिक बाजू सावराल. कामातील रस वाढेल. व्यवसाय वृद्धीचे नियोजन सुरू कराल. गुरुची साथ असल्याने कष्टाचे चीज होईल. थोडी हिंमत दाखवा. भाग्यातील मंगळ पुष्टी देईल. चला पुढे ! जोडीदाराच्या उन्नतीमुळे वातावरण आनंदी असेल. मुलांच्या प्रश्नांना सहज उत्तरे सापडणार नाहीत. धीराने घ्यावे लागेल. नोकरदार वर्गाला वरीष्ठ व्यक्तींचा पाठींबा मिळेल. रक्तातील घटकांचे प्रमाण बिघडेल. योग्य ती काळजी घेणे आवश्यक!

धनु राशी
फेब्रुवारी महिन्यात धनु राशीच्या मंडळींसाठी सुख-समाधानाचे आणि भरभराटीचे योग आहे. नव्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हसत-हसत उचलाल. हात घालाल त्या गोष्टीत यश मिळेल. घर व काम दोन्हीकडे संतुलन राखण्याची गरज आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. भविष्याच्या नियोजनाच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यासाठी हा योग्य काळ आहे. लग्नाचे योग आहेत. जुने मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनंतर भेटतील.

Team BM