फाल्गुन महिना सुरू झाल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? माता लक्ष्मी वर्षभर देणार प्रचंड धनलाभाची संधी

फाल्गुन महिना सुरू झाल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? माता लक्ष्मी वर्षभर देणार प्रचंड धनलाभाची संधी

हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिना हा वर्षाचा शेवटचा महिना मानला जातो. ६ फेब्रुवारीपासून फाल्गुन महिना सुरू झाला असून ७ मार्च पर्यंत संपेल. धार्मिक दृष्टिकोनातूनही फाल्गुन महिना अतिशय शुभ मानण्यात येतो. भगवान शिव, श्रीकृष्ण आणि चंद्रदेव यांच्या उपासनेचा फाल्गुन महिना आहे. या महिन्यात होळी, महाशिवरात्री हे सण साजरे केले जातात. फाल्गुन महिना हा काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल..

मेष- मेष राशीसाठी फाल्गुन महिना अत्यंत शुभ ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी यावेळी पदोन्नती आणि पगार वाढीची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. या काळात तुम्ही एखादी नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. तसंच या काळात तुम्हाला लांबचा प्रवास करण्याची देखील संधी मिळेल.

मिथुन- फाल्गुन महिना सुरू झाल्याने मिथुन राशीचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. या काळात तुमच्या कुटुंबात धार्मिक कार्य पार पडेल. तसंच हा काळ स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तसंच या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल. तसेच तुम्हाला यावेळी धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. तुम्हाला या काळात तुमच्या मित्राची चांगली साथ मिळेल, ज्यामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. समाजात देखील तुमचा मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे.

सिंह- फाल्गुन महिना सुरू होताच तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. या काळात तुमचा समाजातील मानसन्मान वाढेल. तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता दिसत आहे. तसंच या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांची चांगली साथ लाभेल, ज्यामुळे अडकलेली अनेक कामे मार्गे लागतील. याशिवाय तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता.

Team BM