मराठी बिग बॉस मधील या स्पर्धकाच्या पत्नीला पाहिले का? आहे प्रसिद्ध डॉक्टर

मराठी बिग बॉस मधील या स्पर्धकाच्या पत्नीला पाहिले का? आहे प्रसिद्ध डॉक्टर

कलर्स मराठी या वाहिनीवर मराठी बिग बॉस सुरू होऊन आता जवळपास एक महिन्याचा कालावधी होत आहे. या कालावधीमध्ये अनेक कलाकारांसोबत आपल्याला माहिती मिळाली आहे. या शोमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झालेल्या आहे. यंदा मात्र काही व्यक्ती सहभागी झाल्याने वाद देखील निर्माण झाला आहे.

यामध्ये भुमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई या सहभागी झाल्याने त्यांच्यावर देखील अनेकांनी टीका केली होती. त्याचप्रमाणे कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील ही देखील यामध्ये सहभागी झाल्याने तिच्यावर देखील अनेकांनी टीका केली होती. मात्र गेल्या काही भागापासून ती या शोमध्ये आता दिसत नाही.

कारण की तिला बरे वाटत नव्हते. त्यामुळे तिला या शोचा बाहेर काही दिवस राहण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले होते आणि महेश मांजरेकर यांनी देखील तिला बिग बॉस च्या घराबाहेर काही दिवस राहण्याचा सल्ला दिला. तसेच बरे वाटल्यानंतर या शोमध्ये परत येण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आता शिवलीला ही या शोमध्ये परत येणार नाही, असे देखील सांगण्यात येत आहे.

त्याबरोबर या शोमध्ये स्नेहा वाघ ही देखील सहभागी झाली आहे. यासोबतच स्नेहा वाघ सोबत तिचा घटस्फोटीत पती अविष्कार दारव्हेकर हा देखील सहभागी झाला आहे. या दोघांनी जवळपास नऊ वर्षे एकत्र संसार केला. त्यानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर स्नेहा वाघ हिने अनुराग साळवी याच्यासोबत लग्न केले.

मात्र, तिचा त्याच्यासोबतही घटस्फोट झाला. त्यानंतर स्नेहा वाघ हिचे फैजल खान याच्यासोबत नाते जोडल्या गेले. याच बरोबर या शोमध्ये सोनाली पाटील ही सोनाली पाटील हिने देव माणूस या मालिकेमध्ये अतिशय उत्कृष्ट असे काम केले होते. या शो मध्ये विशाल निकम हा देखील सहभागी झाला आहे.

त्याने देखील याआधी अनेक मालिका व जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच जय दुधाने हा देखील उत्कृष्ट मॉडेल आणि उद्योजक सहभागी झाला आहे. त्याची काही दिवसापासून या शोमध्ये चर्चा होताना दिसत आहे. मीरा जगन्नाथ ही एक अभिनेत्री देखील या बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाली आहे. ती पहिल्या दिवसापासून वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे.

याचप्रमाणे डॉक्टर उत्कर्ष शिंदे हादेखील या बिग बॉसच्या घरात आला आहे. उत्कर्ष शिंदे हा प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मुलगा आहे. त्याचा भाऊ आदर्श शिंदे हा देखील उत्कृष्ट गायक आहे. उत्कर्ष शिंदे याने काही दिवसांपूर्वीच शिवलीला बाळासाहेब पाटील हीच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती.

मात्र, कालांतराने हा वाद शमला. बिग बॉसमध्ये नेहमी टास्क देण्यात येतात. पहिल्या टास्कमध्ये उत्कर्ष लिहा एका भागाचा कप्तान झाल्याचे दाखवण्यात आले आहे. उत्कर्ष शिंदे यांच्या पत्नीचे नाव स्वप्नजा शिंदे आहे. स्वप्नजा ही देखील एक प्रख्यात डॉक्टर आहे. पाच वर्षांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात त्यांचे मुंबई येथे लग्न करण्यात आले होते.

त्यानंतर दोघेही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात तर आपल्याला उत्कर्ष शिंदे आवडतो का त्यामुळे नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra