आजचा दिवस यामुळे ठरतोय अधीक खास आणि शुभ, तुम्ही देखील ठेवाल लक्षात

आजचा दिवस २२ फेब्रुवारी २०२२ शुभ मंगळवार म्हणून ओळखला जात आहे. पण मंगळवार हा दर आठवड्याला येतो तर या मंगळवारात विशेष काय असा प्रश्न पडतो. तुमच्या मनात निर्माण होणार्या या प्रश्नाचे उत्तर असे आहे की २२ फेब्रुवारीचा दिवस हॅपी ट्युजडे म्हणजेच शुभ मंगळवार. किंबहुना आज असा योगायोग घडला आहे की या दिवशी कोणतेही काम करणे खूप शुभ असते. कारण आज ज्या प्रकारचा योगायोग झाला आहे, तसा योगायोग शतकानुशतकानंतर घडतो.
आजच्या तारखेवर नजर टाकली तर लक्षात येईल की आजच्या तारखेत क्रमांक २ आणि ३ चा प्रभाव आहे. २२-०२-२०२२ या तारखेचे आकडे पाहा, येथे क्रमांक दोन ६ वेळा दिसत आहे. अशा स्थितीत या दिवशी क्रमांक दोनचा प्रभाव अधिक असून, चंद्राचा अंक आहे. आता या सर्व संख्याची बेरीज केल्यास पाहा १२ येईल, जो जोडल्यावर म्हणजे त्यांचीही बेरीज केल्यावर ३ क्रमांक येतो जो गुरुचा अंक आहे. इथे अंकशास्त्राला महत्व प्राप्त झालं आहे.
गजकेसरी योगा सारखीच शुभ स्थिती- ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्र आणि गुरू हे अतिशय शुभ मानले जातात आणि त्यांच्या संयोगातून गजकेसरी योग तयार होतो. आजच्या तारखेत केलेल्या अंकांच्या संयोगाने गजकेसरी योग सारखीच शुभ स्थिती निर्माण होत आहे. अंकशास्त्रानुसार असा योगायोग होणे दुर्मिळ आहे. या संयोगात कोणतेही शुभ कार्य केले तरी यश मिळण्याची शक्यता खूप जास्त असते.
राहूचा शुभ प्रभाव- दुसरीकडे, तारीख २+२ आणि वर्ष २+२ ची बेरीज देखील ४ होते. अंकशास्त्रात राहूला ४ अंकांचा स्वामी म्हटले आहे, जो अशुभ ग्रह मानला जातो, परंतु अचानक यश मिळण्यामागे राहूच असतो. अशा परिस्थितीत, तुम्ही काही नवीन काम सुरू केल्यास आजचा मंगळवार तुमच्यासाठी शुभ असू शकतो. या दिवशी तुम्ही हनुमानाची पूजा करा आणि मंगळाच्या मंत्रांचा उच्चार करून एखादी इच्छा मागितली तर ती पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते.
पॅलिंड्रोम आणि अँबिग्राम- आजचा दिवस दुर्मिळ आहे. कारण आजची तारीख ही फक्त पॅलिंड्रोम नाही तर अँबिग्राम देखील आहे. आजची तारीख २२ फेब्रुवारी २०२२ आहे. जर तुम्ही निट पाहिलं तर संख्यात्मक रूपात ही तारीख २२/०२/२०२२ अशा प्रकारे लिहिली जाते. त्यामुळे ही एक पॅलिंड्रोम डेट आहे. तसेच ही अँबिग्राम देखील आहे. कारण ही तारीख सरळ आणि उल्टी वाचल्यानंतर एकसारखी दिसते.