‘दिल दोस्ती दुनियादारी’ मधल्या ‘या’ कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर, झाले जवळच्या व्यक्तीचे निधन

मराठी इंडियन आयडल या शो नुकताच संपला आहे. या शो चे जज अजय अतुल होते. प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने या कार्यक्रमाचे अँकरिंग केले होते. स्वानंदी हिला आपण एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतो. सोबतच ती एक उत्तम गायिका देखील आहे.
स्वानंदीला गाण्याचा वारसा तिच्या आईकडून म्हणजेच प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्याकडून मिळाला, तर अभिनयाचा वारसा वडील उदय टिकेकर यांच्याकडून मिळाला आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून स्वानंदी घराघरात लोकप्रिय झाली. तर सिंगिंग स्टार या कार्यक्रमामधून एक गायिका म्हणून ओळख मिळवली.
या कार्यक्रमाची ट्रॉफी घरी सुद्धा घेऊन गेली. स्वानंदी मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती पारंपरिक किंवा वेस्टर्न लूकमध्ये आपले फोटो चाहत्यांसोबत कायम शेअर करताना दिसते. तिचे गाण्याचे व्हिडिओ सुद्धा लक्षवेधी असे असतात.
स्वानंदी टिकेकर ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी अनेकदा संवाद देखील साधत असते. तसेच आपले वेगवेगळे फोटो व्हिडिओ आणि इतर गोष्टी देखील ती शेअर करत असते.
तिचे व्हिडिओ आणि इतर गोष्टींना देखील मोठ्या प्रमाणात चाहते लाईक करत असतात आणि शेअर करत असतात. स्वानंदी टिकेकर ही तिच्या वेगळ्या संवादासाठी देखील अतिशय चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोवर सध्या बनलेले आहेत.
आता स्वानंदी टिकेकर हिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एक दुःखद घटना घडली आहे. ही दुःखद घटना म्हणजे स्वानंदी टिकेकरच्या मामाचे नुकतेच निधन झाले आहे. स्वानंदी टिकेकर हिचे मामा हे दिव्यांग होते. आपल्या मामाचा तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि मामांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मामासोबत चा तिचा हा व्हिडिओ अतिशय गंमतशीर असा झाला आहे. माझ्या भाचीचा मला खूप अभिमान आहे, असे तिचे मामा म्हणताना दिसत आहेत. त्यावर स्वानंदी हिने कॅप्शन लिहून सांगितले आहे की, मामा तुझ्यासारखा स्वच्छंदी आणि मनमुराद जगणारा व्यक्ती दुसरा कोणी नाही. आता मला आशीर्वादाने कोण देईल? असे तुम्ही म्हटले आहे.