‘धुम धडाका’ चित्रपटातील ‘अंबाक्का’ आठवतेय का?, पहा आता कशी दिसते

‘धुम धडाका’ चित्रपटातील ‘अंबाक्का’ आठवतेय का?, पहा आता कशी दिसते

साधारणत: 1985 या सुमाराला धुमधडाका हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले होते. मराठी चित्रपट सृष्टीचा हा अजरामर चित्रपट म्हणावा लागेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते.

महेश कोठारे यांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत अनेक चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे. या तिघांची जोडी ही प्रचंड गाजलेली आहे. या सर्वांनी अफलातून असे मराठी चित्रपट चित्रपट दिलेले आहेत. आज आम्ही आपल्या धूमधडाका या चित्रपटामध्ये दिसलेल्या अंबाक्का हिच्या भूमिकेविषयी माहिती देणार आहोत.

अंबाक्का ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या काय करते, याबाबत आपल्याला माहिती देऊ. धुमधडाका या चित्रपटांमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासह अनेक अभिनेते आणि अभिनेत्री देखील दिसल्या होत्या. यामध्ये निवेदिता सराफ जोशी देखील दिसली.

तिच्यासोबत ऐश्वर्या राणे देखील दिसली होती. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत झपाटलेला हा चित्रपट देखील केला होता. त्यांचा हा झपाटलेला पिक्चर प्रचंड चालला होता. हा चित्रपट एवढा गाजला की, या चित्रपटाची हिंदी मध्ये देखील निर्मिती करण्यात आली.

तसेच त्यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबतचा शेवटचा पिक्चर पछाडलेला केला होता. पछाडलेला हा चित्रपटही प्रचंड चालला होता. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे दुर्दैवी निधन झाले. महेश कोठारे सध्या मालिका क्षेत्रांमध्ये देखील चांगलेच नाव कमावताना दिसतात.

स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या “सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेची निर्मिती महेश कोठारे हेच करत आहेत. त्यामुळे या माध्यमातूनही ते आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत. धूमधडाका या चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका गाजली होती. त्यांच्यासोबत काम करणारी अभिनेत्री अंबाक्का म्हणजेच अभिनेत्री प्रेमा किरण या आहेत.

प्रेमा किरण आजही सक्रिय आहेत. प्रेमा किरण यांनी त्या चित्रपटात अतिशय जबरदस्त अशी भूमिका केली होती. हा चित्रपट हिट झाल्यानंतर प्रेमा किरण यांनी अनेक चित्रपटात काम केले. यामध्ये “उतावळा नवरा”, पागल पण, अर्जुन देवा, लग्नाची वरात लंडनला यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

हे चित्रपट त्यांचे प्रचंड गाजले होते. 1989 मध्ये आलेल्या उतावळा नवरा या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. या चित्रपटातून त्यांना चांगली कमाई देखील झाली होती. 2017 मध्ये पितांबर काळे यांच्या पुढारी चोर या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिगंबर नाईक, किशोर नांदलस्कर यांच्या भूमिका होत्या.

यासोबतच त्यांनी फ्रेंडशिप या चित्रपटात काम केले होते. अलीकडेच प्रेमा किरण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

त्याच बरोबर दूरदर्शनवर काम करणाऱ्या कलाकारांना तीन-तीन महिने मानधन भेटत नाही, असे देखील त्यांनी सांगितले. यासाठी आपण भविष्यात काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. महामंडळाच्या माध्यमातून हे काम करणे शक्य होईल, असेही त्या म्हणाल्या होत्या. तर आपल्याला प्रेमा आवडतात का? आम्हाला नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra