धक्कादायक ! ‘चकनी’ आहे म्हणून ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची चित्रपटातुन हकालपट्टी

अभिनेत्री सई ताम्हणकरचे नाव घेतले की, आपल्याला सर्वप्रथम दुनियादारी या चित्रपटातील तिने साकारलेली बोल्ड भूमिका आठवते. मात्र, सई ताम्हणकर हिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. सई ताम्हणकर हीचा जन्म सांगली जिल्ह्यात झालेला असून ती सध्या 36 वर्षाची आहे. तिने आजवर अनेक चित्रपटात काम केले. काही दिवसांपूर्वी ती चर्चेत आली होती.
कारण लग्न केल्यानंतर तिने काही वर्षातच आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. अमेय गोस्वामी यासोबत तिने लग्न केले होते. मात्र, काही वर्षातच त्यांचा संसार संपुष्टात आला. सध्या ती सिंगल असून आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करीत आहे. सईने याआधी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.
सनई चौघडे या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर दुनियादारी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आमिर खान याचा गाजलेला गजनी चित्रपटात देखील तिने अतिशय छोटा रोल केला होता. मात्र, छोटा रोल असला तरी तिने केलेली भूमिका सर्वांनाच आवडली होती. त्यानंतर तिला हिंदी चित्रपटाच्या अनेक ऑफर मिळाल्या होत्या.
स्वप्निल जोशीसोबत तिची केमिस्ट्री ही अतिशय चांगली जुळत असल्याचे आजवर आपण पाहिले असेल. अंकुश चौधरी याच्या सोबतही तिने काही चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी एका नाटकादरम्यान सई हिची अमेयासोबत भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट केली होती आणि काही वर्षांत दोघांनी लग्न केले होते.
मात्र, अवघ्या तीन वर्षात त्यांचा संसार संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते. यामधील कारणे स्पष्ट झाली नसली तरी दोघांमध्ये वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात सई ताम्हणकर रस्त्यावर अर्धनग्न धावत निघाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या वेळीही ती चर्चेत आली होती.
एकूणच सई ताम्हणकर आणि वाद हे समीकरण चांगलेच जुळलेले आहे. तसेच सई ताम्हणकर हिने अनेक चित्रपटात बोल्ड सीन देऊन धुमाकूळ घातला होता. काही वर्षांपूर्वी तिने बिकनी सीन देऊन अतिशय धुमाकूळ घातला होता. कदाचित मराठी चित्रपट सृष्टीत असा प्रयोग करणारी ती पहिली अभिनेत्री ठरली होती.
या चित्रपटात दिला होता बोल्ड सीन- काही वर्षांपूर्वी हंटर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सई ताम्हणकर सोबत राधिका आपटे हिने काम केले होते.या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स देण्यात आले आहेत. राधिका आपटे हिने यापूर्वीच काही चित्रपटात अतिशय बोल्ड सीन देऊन वाहवा मिळवली आहे. मात्र, या चित्रपटात सई ताम्हणकर हिने किचनमध्ये किसिंग सीन दिला होता.
आता सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सई ताम्हणकर हिने नुकतीच एक स्फोटक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने अनेक बाबींचा खुलासा केला आहे. ही मुलाखत म्हणजे बस बाई बस या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. बस बाई बस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे करत आहेत.
सुबोध भावे यांनी आजवर अनेक अभिनेत्री आणि सेलिब्रिटींना या माध्यमातून बोलत केले आहे. सुरुवातीला या कार्यक्रमांमध्ये अमृता फडणवीस, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. आता सई ताम्हणकर या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर सई ताम्हणकर हिने अनेक प्रश्नांना उत्तर दिले आणि तिने एक किस्सा सांगितला की, बऱ्याच वर्षापूर्वी मला एक चित्रपट मिळाला होता.
या चित्रपटासाठी मला अंतिम केलं होतं. मात्र, नंतर मला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले नंतर मी त्यांना कारण विचारले तर मला सांगण्यात आले की, तू चकणी आहेस, त्यामुळे तुला या चित्रपटात घेता येणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर मी एकदम हादरून गेले होते, असे देखील सई ताम्हणकर हिने सांगितले आहे.