तुम्हाला माहित आहे का, धनसंपत्तीसाठी ‘कोणत्या’ वस्तू घरात ठेवाव्यात, यामुळे धनदेवता प्रसन्न होईल

तुम्हाला माहित आहे का, धनसंपत्तीसाठी ‘कोणत्या’ वस्तू घरात ठेवाव्यात, यामुळे धनदेवता प्रसन्न होईल

वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी घरात आणल्या तर पैश्याची कमतरता दूर होऊ शकते. आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्याघरात ठेऊन तुम्ही पैश्याची कमतरता आणि नकारात्मक एनर्जी दूर ठेवू शकता.अनेकदा अनेक प्रयत्न करून ही जीवनात सफलता, शांती आणि सुख मिळत नाही.

खूप मेहनत करणारे मन लावून काम करणारे पण कठिण परिस्थितीचा सामना करत असतात. यामागे वास्तू दोष असू शकतो असं मानतात. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात जीवन योग्य पद्धतीने जगण्यासाठी काही नियम बनवले गेले आहेत. त्यांना दुर्लिक्षित करणं त्रासाचे कारण होवू शकतं. त्याने होणारे वास्तू दोष पैश्यांची कमतरता, शारिरीक आणि इतर समस्यांचे कारण ठरू शकते. पैश्याचे प्रॉब्लम जीवन त्रासदायक करू शकतात.

काही लोकांकडे पैसे येतात तितक्याच वेगाने ते जातात. पैश्यांची समस्या धनसंपत्ती कमी असणं ही एस अशी समस्या आहे, जी जीवनात अनेक प्रॉब्लमचं कारण ठरू शकते. तुम्ही वास्तुशास्त्रानुसार काही वस्तु घरात आणून धनासंपत्तीची कमतरतेची समस्या दूर करू शकता. आम्ही तुम्हाल काही अशा गोष्टी सांगणार आहोत, ते उपाय करून तुम्ही धनसंपत्तीची कमतरता आणि नकारात्मक एनर्जी दूर ठोवू शकता.

नारळ- हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्याआधी नारळ अर्पण केला जातो. नारळाची पूजा केली जाते. नारळ फोडला जातो. नारळाचे धार्मिक महत्व असण्यासोबतच ते धनसंपत्ती संबंधीत वास्तू दोष दूर करण्याचे काम करतो. नारळ लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय असतो. त्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. नारळ ठेवल्याने धनाची कमतरता भासत नाही आणि जीवनात सुख समृद्धी नांदते.

शंख- सनातन धर्मात शंखाचे विशेष महत्व आहे. शंखाला विशेष पूजनीय मानलं जातं. नियमीत घरात शंख वाजवला तर घरातील नकारात्मकता दूर होते असं मानलं जातं. घरातील क्लेश दूर होतात. घरात सुख शांती नांदते. शंख नारायण देवाच्या हातात कायम असतो. याव्यतिरिक्त शंख लक्ष्मी मातेला देखील अतिप्रिय आहे. कारण त्याची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली होती. त्यामुळे शंखाला लक्ष्मी मातेचा भाऊ म्हणतात. जर तुम्ही शंख घरात आणतात तर त्याने लक्ष्मी माता प्रसन्न होवू शकते आणि त्याने आर्थिक तंगी दूर होवू शकते.

लक्ष्मी देवी आणि कुबेर देवाचा फोटो- जीवनातील आर्थिक तंगी दूर करण्यासाठी लक्ष्मी देवीचा आणि कुबेर देवाचा एकत्र फोटो घरात लावा. धनसंपत्तीची देवता म्हणून कुबेर देवाला मानतात. कुबेर देवाचा फोटो धनसंपत्तीची समस्या दूर करेल. त्याचबरोबर प्रगतीचे नवे मार्ग देखील मोकळे होतील. शास्त्रानुसार धन प्राप्तीसाठी देवी महालक्ष्मीची उपासना केली पाहिजे.

त्यासोबतच धनाचे देवता कुबेर यांचीही पूजा केल्याने पैश्याच्या सर्व अडचणी दूर होतील. कुबेर हे देवतांचे कोषाध्यक्ष मानले जातात. यामुळे कुबेराचा फोटो किंवा मूर्ती घरात ठेवावी. कुबेराची कृपा प्राप्त झाली तर मनुष्याचे जीवन सुखी होण्यास मदत होते.कुबेरदेव सुख-समृद्धी, धन प्राप्त करणारे देवता आहेत.

( दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Team Beauty Of Maharashtra