देवमाणूस ! अजित कुमार देवचा मृत्यू ..? बज्याने केलाय इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर, पहा व्हिडिओ

देवमाणूस ! अजित कुमार देवचा मृत्यू ..? बज्याने केलाय इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर, पहा व्हिडिओ

देव माणूस मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या वैविध्यपूर्ण अशा आहेत. मालिकेतील अजित कुमार देव उर्फ देवी सिंग याची भूमिका किरण गायकवाड या अभिनेत्याने साकारलेली आहे. त्याने ही भूमिका अतिशय दर्जेदार अशी साकारलेली आहे. ती नकारात्मक असली तरी प्रेक्षकांना खूप आवडते. याबाबत मध्यंतरी त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता.

यामध्ये तो म्हणाला होता की, माझी देव माणूस मधील भूमिका माझ्या आईला अजिबात आवडत नाही. याचे कारण ही तसेच आहे. कारण माझ्या आईला तिच्या मैत्रिणी या रागवत असतात आणि म्हणत असतात की, तुझ्या मुलाला चांगले काम करायला सांग. त्यामुळे आता मी चांगली भूमिका करणार असल्याचे त्याने सांगितले. गेल्या काही भागांमध्ये ही मालिका निर्णायक टप्प्यावर आल्याचे दिसत आहे.

अजित कुमार देव हा तुरुंगातून पळून जाताना देखील एक व्हिडिओ शेअर झाला होता. मालिकेमध्ये एसीपी दिव्या सिंह आता अजित कुमार याला शिक्षा देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. गेल्या भागामध्ये इन्स्पेक्टर शिंदे आणि शिर्के यांनी एक महत्त्वाची फाइल एसीपी दिव्या सिंह यांच्याकडे दिलेली आहे. या फाईलमध्ये कुठला असा महत्त्वाचा पुरावा आहे ज्यामुळे अजित कुमार देव त्याला शिक्षा होऊ शकते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

मात्र, अजित कुमार देव यांच्या पोटामध्ये विजय हा कैची खुपसत असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, अजित कुमार देव याला हे पडलेले स्वप्न असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, तरीदेखील अजित हा विजय याला घाबरतो. विजय आपल्याला संपवण्यासाठी आता काहीही करेल, असे त्याला वाटत आहे. त्यामुळे तो त्याला संपवण्याचा डाव देखील आखतो. या मालिकेत आणखीन एक महत्त्वाचे पात्र म्हणजे बज्याचे होय. बजा याचे पात्र किरण डांगे या अभिनेत्याने साकारले आहे.

मध्यंतरी या किरण डांगेचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वर व्हायरल झाला होता. किरणा इंस्टाग्राम वर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. या व्हिडिओमध्ये किरण डांगे हा रिक्षा चालवताना दिसत आहे. यावर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले होते. अभिनय हे क्षेत्र असे आहे की जेथे सातत्यपूर्ण काम हे मिळत नाही. त्यामुळे मला कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये रिक्षा हा चालवावा लागतो.

त्यामुळे कुठलेही काम हे छोटे किंवा मोठे नसते. त्यामुळे कोणीही काम करताना लाजू नये, असे त्याने म्हटले होते. याच बज्याने आता नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजित कुमार देव हा जखमी अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता अजित कुमार देव मरतो की वाचतो हे आगामी भागात स्पष्ट होणार आहे.

जखमी अवस्थेतील हा व्हिडिओ मालिकेचा भाग असल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील आता ताणली आहे.

Team Beauty Of Maharastra