‘देवमाणूस’ मालिकेमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची इंट्री

‘देवमाणूस’ मालिकेमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची इंट्री

देव माणूस ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. त्यामुळे आता या मालिकेचा दुसरा भाग देखील बनवण्यात आला आहे. हा दुसरा भाग देखील लोकप्रिय ठरत असताना या मालिकेची वेळ मात्र बदलण्यात आली. पहिला भाग हा प्रचंड गाजल्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग देखील बनवण्यात आला.

ही मालिका एका सत्य घटनेवर आधारित असून पश्चिम महाराष्ट्रातील एका शहरात काही वर्षांपूर्वी संतोष पोळ नावाचा एक बोगस डॉक्टर राहत होता. या बोगस डॉक्टरने जवळपास सहा जणांना जिवंत मारून त्यांचे मृतदेह गाडले होते. त्यानंतर त्याला काही वर्षापूर्वी अटक देखील करण्यात आली आहे.

आता हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. या सत्यघटनेवर आधारित ही मालिका बनवण्यात आली. या मालिकेमध्ये किरण गायकवाड याने डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंह ही भूमिका साकारली आहे. किरण गायकवाड हा अतिशय जबरदस्त असा अभिनेता असून त्याने यादीदेखील लागिर झालं जी या मालिकेत काम केले होते.

या मालिकेत त्याने नकारात्मक भूमिका केली होती. देव माणूसच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला एसीपी दिव्या सिंह ही भूमिका देखील दिसली होती. ही भूमिका देखील प्रचंड गाजली होती. ही भूमिका अभिनेत्री नेहा खान हिने साकारली होती. नेहा खान ही देखील अतिशय चांगली अभिनेत्री आहे. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये तिने मराठी चित्रपटसृष्टी तसेच बॉलिवूडमध्ये करिअर केले आहे.

तिच्याकडे अनेक मालिका आणि चित्रपट देखील असल्याचे सांगण्यात येते तर आता या मालिकेमध्ये दुसऱ्या भागात मिलिंद शिंदे यांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी इन्स्पेक्टरची भूमिका अतिशय जबरदस्त रित्या साकारली आहे. मिलिंद शिंदे हे मराठी मधील दिग्गज असे अभिनेते असून त्यांनी याआधी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

अतिशय दमदार असा त्यांचा अभिनय असतो. आता देव माणूस च्या दुसऱ्या भागात ते चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहेत. देव माणूस मालिकेची वेळ ही काही दिवसापूर्वी बदलण्यात आली आहे. यामुळे या मालिकेचा टीआरपी घसरला याची चर्चा देखील सुरू झाली आहे.

आता या मालिकेमध्ये नवीन अभिनेत्रीची एन्ट्री आली आहे. तेजस्विनी लोणारे हिने या मालिकेत एन्ट्री केली आहे. या मालिकेत तेजस्विनी हिने मालिकेत आमदार बनली आहे. तेजस्विनी हिने याआधी अनेक मालिका आणि चित्रपटात काही काम केले आहे. त्याची देवमाणूस मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

अतिशय निरागस असा लुक आणि बोलण्याची लकब यामुळे तिची ही भूमिका चांगली गाजत आहे. देव माणूस मालिकेतील आमदारची भूमिका आपण एन्जॉय करत असल्याचे तिने सांगितले.

Team Beauty Of Maharashtra