चित्रपटसृष्टी हादरली ! चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच ‘या’ बालकलाकाराचे वयाच्या 10 व्या वर्षी निधन

चित्रपट सृष्टीमध्ये सध्या अनेक कलाकार हे आपल्याला सोडून गेल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून पाहायला, ऐकायला मिळालेल्या आहेत. यामध्ये आता एका बालकलाकार देखील समावेश झाला आहे. आपल्याला वाटले असेल की, हा बालकलाकार नेमका आहे तरी कोण, याबद्दलच आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.
मनोरंजन विश्वामध्ये गेल्या काही दिवसात अनेक कलाकार हे आपल्याला सोडून गेले आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत, तर काही जणांना आजारांनी ग्रासले होते. यामध्ये त्यांचे निधन झाले गेले. काही महिन्यांमध्ये लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी, गायक के के यांच्यासारखे अनेक कलाकार हे आपल्याला सोडून गेले आहेत, तर आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्यानंतर अनेक कलाकारांनी हे जग सोडले. आम्ही आज आपल्याला ज्या कलाकाराबद्दल माहिती देणार आहोत. हा बालकलाकार गुजरात राज्यातला आहे. गुजरात राज्यातला असला तरी त्याने आपल्या अभिनयाची छाप ही सर्वांवरच सोडली होती. राहुल कोळी असे या बालकलाकाराचे नाव आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला.
ऑस्कर मध्ये दाखल झालेल्या चेलो सो या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकार राहुल कोळी याचे अवघ्या वयाच्या 10 वर्षी निधन झाले आहे. राहुल याला ल्युकेमोनिया नावाचा आजार होता. अहमदाबाद येथील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, नुकतेच त्याचे निधन झाले. त्यानंतर चित्रपटसृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
त्याच्या कुटुंबीयांनी जामनगर येथील हापा येथे नुकतीच एक शोकसभा घेतली. यामध्ये अनेकांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला. राहुल याचे वडील ऑटो चालवतात. ऑटो चालून त्यांनी आपल्या मुलाला मोठे केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच राहुल याचे निधन झाले आहे. त्यामुळे आता अनेकांनी यावर शोक व्यक्त केला आहे.
राहुल याचे वडील याबाबत बोलताना म्हणाले की, माझा मुलगा खूप आनंदी होता. मला तो कायम म्हणायचा की, 14 ऑक्टोबर नंतर आपले दिवस बदलून जातील. मात्र, या आधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 14 ऑक्टोबर रोजी त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, त्यांनी अग्नीच जग सोडले. मात्र आता कुटुंबीयांनी राहुल याचा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.