चंद्र ग्रहणाच्या प्रभावापासून बचावासाठी राशीनुसार करा या गोष्टींचे दान

चंद्र ग्रहणाच्या प्रभावापासून बचावासाठी राशीनुसार करा या गोष्टींचे दान

वर्षातील पहिले चंद्रग्रहण होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. हे चंद्रग्रहण तूळ राशीत होत असून सर्व 12 राशींच्या जीवनावर याचा शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. अशा परिस्थितीत चंद्रग्रहणानंतर राशीनुसार दान करणे खूप फायदेशीर ठरू शकते. यासोबतच ग्रहणानंतर दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी वाढते.

चंद्रग्रहणाच्या दिवशी राशीनुसार करा दान
मेष- मेष राशीच्या चंद्रग्रहणाच्या वेळी हनुमान चालिसाचा पाठ करा. तसेच गहू, मसूर, चंदन, लाल फुले दान करा. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांसाठी श्री सूक्ताचे पठण खूप फायदेशीर ठरेल. याशिवाय तांदूळ, दूध, साखर, पांढरी फुले, पांढरे वस्त्र इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे दान करा.

मिथुन- मिथुन राशीच्या लोकांनी दुर्गामातेची पूजा करावी. चंद्रग्रहणानंतर गायीला हिरवा चारा खाऊ घाला, मूग डाळ, हिरव्या भाज्या, फळे, फुले, हिरवे कपडे दान करा. कर्क- चंद्रग्रहण काळात भगवान शंकराची पूजा करा. शिव मंत्रांचा जप करा. ग्रहणानंतर तांदूळ, दूध, तूप, कापूर, मोती, पांढरी फुले इत्यादी दान करा.

सिंह- चंद्रग्रहणाच्या वेळी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. राम मंदिरात गहू, मोहरीचे तेल, लाल वस्त्र, प्रवाळ इत्यादी वस्तू दान करा. कन्या- चंद्रग्रहण काळात गणेश चालिसा वाचा. मंदिरात तूप, कापूर, पैसा, फळे, फुले अर्पण करा.

तूळ- लक्ष्मीस्त्रोत किंवा दुर्गा सप्तशतीचे मानसिक पठण करा. तांदूळ, कापूर, साखर, तूप, भाज्या, फळे, फुले, गहू, कपडे इत्यादी दान करा. वृश्चिक- चंद्रग्रहणाच्या वेळी हनुमान चालीसा, सुंदरकांड किंवा बजरंग बाण पाठ करा. चंद्रग्रहणानंतर भोपळा, गूळ, मसूर डाळ, लाल फुले, लाल कपडे इत्यादी गरीब व गरजूंना दान केल्यास लाभ होईल.

धनु- चंद्रग्रहणाच्या वेळी विष्णु सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करा. चंद्रग्रहणानंतर दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूचे दर्शन घ्या. धान्य, पिवळी फळे, पिवळी फुले, तूप, गहू, मीठ, साखर यांचे दान करा. मकर- चंद्रग्रहण काळात शनि चालिसाचे पठण करा. शनि मंत्रांचा जप करा. चंद्रग्रहणानंतर काळा घोंगडी, काळे अख्खे उडीद आणि १.२५ मीटर काळे कापड दान करा.

कुंभ-चंद्रग्रहणाच्या वेळी शनी चालीसा किंवा बजरंग बाण, सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पाठ करा. ग्रहणानंतर तांदूळ, गहू, मीठ, साखर, कपडे, पैसा, फळे, फुले इत्यादी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. मीन- विष्णु चालीसा किंवा रामायण पाठ करा. माता दुर्गेची उपासना करणे देखील लाभदायक ठरेल. ग्रहणानंतर पिवळी फळे, पिवळे कपडे, हरभरा डाळ, केशर, बेसन, हळद, गूळ दान करा.

Team BM