चंद्राच्या राशीत होतेय शुक्र आणि मंगळाची युती; ‘या’ राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’? प्रमोशनसह अपार पैसा मिळण्याची शक्यता

चंद्राच्या राशीत होतेय शुक्र आणि मंगळाची युती; ‘या’ राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’? प्रमोशनसह अपार पैसा मिळण्याची शक्यता

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे तर काही दिवसांनी शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कर्क राशीत मंगळ आणि शुक्राची युती होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. पण ३ राशी अशा आहेत, ज्यांची या काळात लाभाची आणि प्रगतीची शक्यता आहे. त्या ३ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

कर्क राशी – शुक्र आणि मंगळाची युती कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या लग्न स्थानी होत असून त्याची दृष्टी तुमच्या सप्तम स्थानी पडत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होऊ शकते. तसेच जोडीदाराबरोबरच्या नात्यात गोडवा येऊ शकतो. भागीदारीच्या कामांमध्ये यश मिळू शकते. तर नोकरदार वर्गाला त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगले यश मिळू शकते शिवाय त्यांना नवीन जबाबदारी मिळण्याचीही शक्यता आहे. या काळात तुमच्या घरातील वातावरण चांगले राहू शकते.

तूळ राशी- तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि मंगळाची युती लाभदायक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीतून दहाव्या स्थानी होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकते आणि चांगला नफाही मिळू शकतो. तसेच, जे लोक कापड, लक्झरी वस्तू, फिल्म लाइन, मीडिया, कला आणि संगीत क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला ठरु शकतो. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते तर नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते.

वृश्चिक राशी – शुक्र आणि मंगळ युती वृश्चिक राशीसाठी आर्थिकदृष्ट्या चांगली ठरु शकते. कारण मंगळ ग्रह तुमच्या गोचर कुंडलीतील नवव्या स्थानी ही युती करणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे नशीब चमकू शकते. तसेच या काळात तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकता. तुमचा कल अध्यात्माकडे असू शकतो. तर जे स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ते परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

Team BM