बुडत्याला काठीचा आधार! गुरुच्या राशीत सूर्य आणि बुधाची युती, तीन राशींना होणार फायदा

बुडत्याला काठीचा आधार! गुरुच्या राशीत सूर्य आणि बुधाची युती, तीन राशींना होणार फायदा

ग्रहांचं आणि आपलं वेगळं नातं असतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. आपल्या बाजूने कोणते ग्रह आहेत यावरून आयुष्य जगावं लागतं. तसेच ज्या ग्रहांची बाजू कमकुवत अशा ग्रहांची शांती करावी लागते. म्हणजे ग्रहांच्या वागण्यात तसा सौम्यपणा येतो. तुमच्या जन्माच्या वेळी असलेली ग्रहांची स्थिती आणि ग्रहांचा रोज होणारा गोचर यात सकारात्मकता जुळून आली की चांगले दिवस अनुभवायला मिळतात. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीकडे ज्योतिष लक्ष लावून असतात. अशीच सूर्य आणि बुधाची जोडी सकारात्मक योग जुळवून आणत आहे. या योगाला ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग असं संबोधलं जातं. या योगामुळे सर्वच राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. पण तीन राशींना सर्वाधिक फायदा होईल.

तीन राशीच्या लोकांना होणार फायदा
वृषभ – या राशीच्या उत्पन्न भावात बुधादित्य योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना निश्चितच फायदा होईल. या काळात उत्पन्नात वाढ होईल. तसेच जुन्या गुंतवणुकीतूत धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. त्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. आर्थिक स्थिती सुधारल्याने कौटुंबिक वातावरणही चांगलं राहणार आहे. लग्न न झालेल्यांसाठी या काळात योग्य स्थळ चालून येईल. तर लग्न झालेल्या जोडप्यांना या काळात गुड न्यूज मिळू शकते. आरोग्यही या काळात उत्तम राहील.

मिथुन – या राशीच्या कर्मभावात सूर्य आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे 16 मार्चपासून या राशीच्या जातकांना चांगले दिवस अनुभवयला मिळतील. राजकारणाशी निगडीत लोकांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. तसेच मोठं पद मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळेल. तसेच नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळून शकते. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ सुगीचा असेल. जुनाट आजारातून दिलासा मिळू शकतो.

कर्क – या राशीच्या भाग्य स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. नशिबाच्या घरात दोन ग्रह एकत्र येत असल्याने अचानक धनलाभ होऊ शकतो. म्हणजेच नशिबाची साथ मिळेल. ज्या कामात हात टाकाल ते काम पूर्ण होईल. तसेच जुन्या काही इच्छा असतील त्याही मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. वडिलांसोबतचे संबंध आणखी दृढ होतील. आरोग्याच्या समस्येकडे या काळात दुर्लक्ष करू नका.

Team BM