बुधाचे मकर गोचर: ‘या’ ५ राशींना यश, प्रगतीची संधी; भाग्योदयाचा काळ, लाभच लाभ!

बुधाचे मकर गोचर: ‘या’ ५ राशींना यश, प्रगतीची संधी; भाग्योदयाचा काळ, लाभच लाभ!

फेब्रुवारी महिन्याच्य सुरुवातीला म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी नवग्रहांचा राजकुमार बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे एकाच महिन्यात बुध दोनदा राशीपरिवर्तन करणार आहे. ७ फेब्रुवारीनंतर महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

आताच्या घडीला मकर राशीत नवग्रहांचा राजा सूर्य विराजमान आहे. १३ फेब्रुवारी रोजी सूर्य मकर रास बदलून कुंभ राशीत प्रवेश करेल. बुधाने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य आणि बुधाच्या युतीचा अतिशय शुभ मानला गेलेला बुधादित्य योग जुळून येईल.

बुधाचा मकर राशीतील प्रवेश काही राशींसाठी लाभदायक मानला गेला आहे. कोणत्या राशीसाठी आगामी काळ संधींचा आणि भाग्योदयकारक ठरेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींना २७ फेब्रुवारीपर्यंत नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल, यश-प्रगती साध्य करता येऊ शकेल? जाणून घेऊया…

मेष राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर अतिशय अनुकूल ठरु शकेल. कार्यक्षेत्रात यश मिळवू शकाल. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. नोकरदार लोकांनाही बढती मिळू शकते. व्यावसायिकांसाठीही हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ग्रहमान अनुकूल आहे.

मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर फायदेशीर ठरू शकेल. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या व्यक्तींना आगामी काळात अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतील. सर्व कामे पूर्ण होतील. सामाजिक स्थितीही सुधारेल. सासरच्या मंडळींशी तुमचे संबंध चांगले राहतील. चांगल्या गोष्टी घडल्यामुळे मन खूप आनंदी असेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर यशकारक ठरू शकेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. विरोधकही शांत राहतील. नोकरदार लोकांसाठी खूप फायदेशीर काळ ठरू शकेल. चांगले परिणाम मिळतील. कर्ज वगैरे घेतले असल्यास ते फेडता येईल. कामात यश मिळू लागेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर आनंददायी ठरू शकेल. आरोग्यात सुधारणा होईल. चल-अचल मालमत्ता खरेदी करू शकता. यातून भरपूर नफा मिळेल. चांगल्या लोकांचा सहवास मिळेल. बुधाचा मकर राशीत प्रवेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मीन राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर फायदेशीर सिद्ध होऊ शकेल. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतील. आर्थिक स्थितीच्या दृष्टीनेही आगामी काळ लाभदायक ठरू शकेल. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. नोकरदार वर्गांना नानाविध लाभ मिळू शकतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले निकाल मिळू शकतील.

७ फेब्रुवारी रोजी बुधचा मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. तसेच शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे.

Team BM