बुध गोचरामुळे तयार होणार त्रिकोण राजयोग, या तीन राशींना मिळणार लाभ

बुध गोचरामुळे तयार होणार त्रिकोण राजयोग, या तीन राशींना मिळणार लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या गोचर कालावधीनुसार राशी बदल करत असतो. विशेष म्हणजे प्रत्येक राशीचा एक गुणधर्म आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचरासोबत स्थानाकडे लक्ष दिलं जातं. काही राशींना शुभ तर राशींना अशुभ परिणाम भोगावा लागतो. ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत गोचर करणार आहे. या गोचरामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात या राजयोगाला शुभ मानलं जातं. या गोचरामुळे काही राशींना शुभ परिणाम दिसून येतील. तीन लकी राशी कोणत्या आहेत जाणून घ्या.

मेष- बुध गोचरामुळे मेष राशीच्या जातकांना फायदा होईल. केंद्र त्रिकोण राजयोग मेष राशीच्या दशम राशीत तयार होत आहे. यामुळे प्रत्येक कार्यात यश मिळताना दिसेल. नोकरीची नवी संधी या काळात मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मिळेल. उद्योगात चांगला नफा या काळात होईल.

मकर- बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे मकर राशीला शुभ संकेत मिळतील. केंद्र त्रिकोण या राशीच्या लोकांना फायदेशीर ठरेल. या काळात पैशाचे नवे स्रोत निर्माण होतील.

तूळ- बुध ग्रह तूळ राशीच्या चौथ्या स्थानात गोचर करणार आहे. या गोचरामुळे तयार होणार केंद्र त्रिकोण राजयोग तूळ राशीत तयार होणार आहे. यामुळे अपेक्षित परिणाम अनुभवास येतील. या काळात भौतिक सुखात वृद्धी होईल. वाहन आणि संपत्ती खरेदीचा योग आहे. प्रॉपर्टीशी निगडीत कामात यश मिळेल.

Team BM