बॉलिवूडवर कोसळला दुःखाचा डोंगर ! ह्या लोकप्रिय जेष्ठ अभिनेत्रीचे फुफुसाच्या संसर्गामुळे दुःखद निधन

गेल्या काही महिन्यापासून बॉलीवूडमध्ये अनेक ज्येष्ठ अभिनेत्यांचे निधन झाल्याचे आपण पाहिले आहे. याचे कारण म्हणजे अनेक अभिनेता व अभिनेत्री यांना आजाराने ग्रासलेले होते. आता कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव याला देखील रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
त्याची प्रकृती ही सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी तो उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यामध्ये आपण बॉलीवूड मधून अनेक कलाकारांना गमावले आहे. यामध्ये लता मंगेशकर बप्पी लहरी रमेश देव यांच्यासह प्रसिद्ध गायक के के याचा समावेश आहे, तर अलीकडच्या काळामध्ये ऋषी कपूर इरफान खान यांच्यासारखे जेष्ठ अभिनेते देखील आपल्याला सोडून गेले आहेत.
इरफान खान याचे जाणे सगळ्यांनाच मनाला चटका लावून जाणारे होते. कारण की त्याच्यासारखा हरहुन्नरी अभिनेता आजवर झाला नाही. अतिशय कमी कालावधीमध्ये त्याने बॉलीवूडमध्ये आपले स्थान जमवले होते. मात्र, तो अल्पावधीतच हा जग सोडून गेला. त्यानंतर त्याच्या आठवणींमध्ये आजही अनेक जण दुःखी असतात.
आता देखील बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. या अभिनेत्रीने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले होते. लोकप्रिय अभिनेत्री अनन्या चटर्जी यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांना फुफुसाचा संसर्ग झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांनी उपचारादरम्यान अंतिम श्वास घेतला.
तिच्या निधनाची बातमी कळतात तिच्या चाहत्यांनी आणि चित्रपट सृष्टीतील आणि कलाकारांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे. कारण अनन्या ही अतिशय छान अशी अभिनेत्री होती आणि सगळ्यांसोबत तिचे खूप चांगले जमायचे. दिग्दर्शिका सर्वाधिकारी यांनी ट्विटरवर अनन्या यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
तिच्या सारखी अभिनेत्री मी आजवर कधीही पाहिली नव्हती. ती अतिशय उत्तम स्वभाव असणारी अभिनेत्री होती. तिच्यासारखे गुणधर्म कुणामध्येही नव्हते, असे तिने म्हटले. अभिनेत्री श्री लेखा मित्रा हिनेदेखील तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
आम्ही एकत्र काम देखील केले आहे असे देखील श्री लेखा मित्र यांनी सांगितले आहे. त्यावेळेस आम्हाला खूपच मजा आली होती असेही त्या म्हणाल्या.