धक्कादायक : एका सर्जरीने बिघडला प्रसिद्ध अभिनेत्रीचा चेहरा; पाहून बसेल धक्का

धक्कादायक : एका सर्जरीने बिघडला प्रसिद्ध अभिनेत्रीचा चेहरा; पाहून बसेल धक्का

तसं, प्रत्येकाचा चेहरा प्रत्येकासाठी किती मौल्यवान आहे हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे. पण टीव्ही आणि फिल्म स्टार्सला त्यांचं सौंदर्य जरा जास्तच महत्त्वाचं आहे. पण नुकतंच एका अभिनेत्रीसोबत असं काही घडलं की, ज्यामुळे तिचा संपूर्ण चेहराच खराब झाला आहे. अभिनेत्रीच्या बिघडलेल्या चेहऱ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

रूट कॅनल करणं पडलं महागात- ज्या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तिचं नाव स्वाती सतीश असून ती कन्नड अभिनेत्री आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘स्वाती बंगळुरूची रहिवासी आहे. तिने नुकतंच रूट कॅनल केलं होतं. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर सूज आली होती आणि तिला खूप वेदना होत होत्या. डॉक्टरांनी स्वातीला सांगितलं की 2-3 दिवसात तिचा चेहरा ठीक होईल आणि सूजही निघून जाईल.

खराब झाला चेहरा- अभिनेत्री स्वातीवर उपचार करून ३ आठवडे उलटून गेले आहेत. पण चेहऱ्यावरची सूज अजूनही गेली नाही आणि वेदनाही असह्य होत आहेत. अभिनेत्रीचा चेहरा इतका खराब झाला आहे की, आता तिला ओळखणं कठीण झालं आहे. तिच्या चेहऱ्यामुळे अभिनेत्रीने घराबाहेर पडणं बंद केलं आहे.

अभिनेत्रीचा डॉक्टरांवर आरोप- स्वाती यांनी डॉक्टरांवर अनेक आरोप केले आहेत. अभिनेत्री म्हणाली की, ‘डॉक्टरांनी तिला उपचार आणि औषधांबाबत चुकीची आणि अर्धवट माहिती दिली. अभिनेत्रीला दुसर्‍या रुग्णालयातून कळलं की तिला ऍनेस्थेसिया नाही तर सॅलिसिलिक ऍसिड देण्यात आलं होतं. या घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर सध्या अभिनेत्री खूप नाराज आहे. स्वातीने ‘एफआयआर’ आणि ‘6 टू 6’ या चित्रपटात काम केलं आहे.

Team Beauty Of Maharashtra