कोण होणार ‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता? सोशल मीडियावर ‘या’ एकाच नावाची चर्चा

कोण होणार ‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता? सोशल मीडियावर ‘या’ एकाच नावाची चर्चा

अवघ्या काही तासांत ‘बिग बॉस मराठी 3’च्या विजेत्याचे नाव महाराष्ट्राला कळणार आहे. त्याआधी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे या टॉप 5 मधून बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सोशल मीडियावरही वेगवेगळे ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत आणि ‘बिग बॉस मराठी 3’चा संभाव्य विजेता कोण असेल? यावरचे विविध अंदाज बघायला मिळत आहेत.

सोशल मीडियावरील विविध पोल्सचा अंदाज बघितला तर जय दुधाणे (Jay Dudhane) आणि विशाल निकम (Vishal Nikam) यांच्यात अगदी ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. पण जयच्या तुलनेत विशालचं पारडं किंचित जड आहे. सोशल मीडियाच्या विविध पोल्समध्ये विशाल निकम हे नाव आघाडीवर आहे.

सोशल मीडियावरील पोल्सच्या अंदाजानुसार, विशालला 28 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. जय दुधाणेला 25 टक्के,विकास पाटील 23 टक्के , मीनल शाह हिला 17 टक्के तर उत्कर्ष शिंदे याला 7 टक्के मतं मिळतील, अशी शक्यता आहे.

या अंदाजानुसार, विशाल हाच ‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तिकिट टू फिनाले जिंकणारा विशाल हा पहिला स्पर्धक होता. बिग बॉसच्या घरात सर्वाधिक फेअर गेम खेळणारा म्हणून तो ओळखला गेला. तरूणाईत आणि सोशल मीडियावर विशालची जबरदस्त के्रझ आहे आणि त्यामुळे तोच ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्राफी जिंकेल, असा दावा त्याचे चाहते करत आहेत.

आपल्या दमदार खेळीने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण करणा-या विकास पाटीलला (Vikas Patil) सोशल मीडिया पोल्समध्ये तिसरा क्रमांक मिळाला आहे. ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात विकास व विशालची मैत्री खूप गाजली. अगदी जय व विरूची जोडी म्हणून ते लोकप्रिय झालेत.

मीनल शहा (Meenal Shah) ही यंदाच्या पर्वात टॉप 5 मध्ये पोहोचलेली एकमेव महिला स्पर्धक आहे. मीनल ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात शेवटपर्यंत जिद्दीने लढली. प्रत्येक टास्क तिनं अगदी प्रामाणिकपणे खेळला. सोशल मीडियावरील ट्रेण्ड्सनुसार मीनलला चौथा नंबर मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) यानेही टॉप 5मध्ये आपली जागा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. सर्वांशी सलोख्याने वागणारा उत्कर्ष प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे. मात्र महाअंतिम फेरीतून उत्कर्ष बाद होणारा पहिला स्पर्धक ठरु शकतो, असा प्रेक्षकांचा अंदाज आहे.आज रात्री 7 वाजता ‘बिग बॉस मराठी 3’ चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे कलर्स मराठी वाहिनी आणि वूटवर हा सोहळा पाहता येणार आहे.

Team Beauty Of Maharashtra