‘बिगबॉस’ च्या ‘या’ निर्णयावर प्रेक्षक चांगलेच भडकले; जाणून घ्या नेमकं काय प्रकरण आहे

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या मराठी बिग बॉस मध्ये आणखीन एक नॉमिनेशन झालेले आहे. नीता शेट्टी ही घराच्या बाहेर पडलेली आहे. तिने चांगला खेळ केला. बिग बॉस म्हणजे महेश मांजरेकर यांनी तिचे कौतुक देखील केले. नीता तू खूप चांगली खेळली आहेस.
मात्र, तुला आता घराच्या बाहेर पडावे लागणार आहे. ती बाहेर पडताना विशाल निकम हा खूप तिच्या गळ्याला पडून रडला. त्याचे कारणही तसेच होते. या दोघांची बाँडिंग शोमध्ये खूप झाली होती. बिग बॉस च्या घरामध्ये नॉमिनेशन या प्रकाराबाबत अधिक माहिती अनेकांना नसते.
नॉमिनेशन म्हणजे आठवड्याला काही सदस्याचे नाव देण्यात येते. या सदस्यांना प्रेक्षकातून मतदान करण्यात येते. सगळ्यात कमी मतदान ज्या स्पर्धकाला होईल. त्याला या घराच्या बाहेर जावे लागते. नुकताच एक प्रकार असा समोर आलेला आहे. याबाबत आपण जाणून घेऊया.
बिग बॉसच्या घरामध्ये आत्तापर्यंत अक्षय वाघमारे त्याच्यानंतर आदिश वैद्य, सुरेखा कुडची, अविष्कार दारव्हेकर आता नीता शेट्टी यांचे नॉमिनेशन झालेली आहे, तर हे सगळे कलाकार बाहेर जाताना अनेक स्पर्धकांना गहिवरून आले होते. तर कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील हि आपण होऊन हा सोडून बाहेर पडली.
तर भुमाता ब्रिगेड च्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांना देखील या शोमधून बाहेर पडावे लागले. बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे का? किंवा या शोमध्ये असे काहीही ठरले नसते. याबाबत कोणीही ठामपणे माहिती देऊ शकत नाही. कारण की आता एका स्पर्धकाला सर्वाधिक कमी मतदान पडल्यानंतरही तो घराच्या बाहेर पडला नाही.
याबाबतच प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहे. संतोष चौधरी म्हणजे दादुस हा या शोमध्ये चांगले खेळत असतो. त्याप्रमाणे महेश मांजरेकर देखील त्याचे कौतुक करत असतात. मात्र, गेल्या काही दिवसापासून महेश मांजरेकर देखील त्यावर भडकले होते.
त्यानंतर गेल्या आठवड्यात नोमिनेशन मध्ये दादूस म्हणजे संतोष चौधरी याचे देखील नाव होते. सगळ्यात कमी मतं मिळाली, तरी देखील बिग बॉसने दादूस घरातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे असे कसे काय होऊ शकते, असे म्हणून प्रेक्षक बिग बॉस वर नाराज झालेले आहेत.
बिग बॉसवर अनेकांनी टीका देखील केली आहे, तर आपल्याला याबाबत काही म्हणायचे असल्यास कृपया कमेंट करा.