‘बिगबॉस’ च्या घरातून या आठवड्यात हा स्पर्धक पडणार घराच्या बाहेर

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या मराठी बिग बॉस तीन हा शो आता रंजक वळणावर आला आहे. हा शो 26 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता या शो मध्ये कोण विजेता होणार याची उत्कंठा ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
26 डिसेंबर रोजी हा शो संपल्यानंतर या शोसाठी दुसरी मालिका सुरू होणार आहे. आता या आठवड्याचे चार नॉमिनेशन झालेली आहेत. ज्या वेळेस नॉमिनेशन सुरू होते. त्यावेळेस वोटिंग लाईन या सुरू होतात. त्यानंतरच प्रेक्षकांना मतदान करता येते. त्यामुळे आता सगळ्यात जास्त मते घेणारा स्पर्धक या शोमध्ये राहील.
या आठवड्यामध्ये एक स्पर्धक घराच्या बाहेर पडल्यानंतर सहा स्पर्धक या शोमध्ये राहतील. त्यानंतर 26 डिसेंबर रोजी ग्रॅड फिनाले होईल आणि त्यामध्ये या सहा स्पर्धकांनी पैकी एकाला विजेता घोषित करण्यात येईल. मात्र, आता चार नॉमिनेशन झालेल्यांपैकी कोण घराच्या बाहेर पडतो, हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे.
बिग बॉसच्या घरामध्ये याआधी अक्षय वाघमारे हा केवळ दोन ते तीन आठवड्यात घराच्या बाहेर पडला होता. त्याच्या जागी वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळालेला आदिश वैद्य याने देखील शोमध्ये धुमाकूळ घातला होता. मात्र, त्याच्यावर सगळेजणच नाराज होते. त्यामुळे अवघ्या काही दिवसात तोदेखील घराच्या बाहेर पडला.
स्नेहा वाघ हिने देखील या शोमध्ये बरीच वाहवा मिळवली आणि तिची चर्चादेखील खूप मोठ्या प्रमाणात झाली. तिचा घटस्फोटित पती अविष्कार दारव्हेकर हा देखील सहभागी झाला होता. कालांतराने स्नेहा वाघ आणि अविष्कार दारव्हेकर हेदेखील या शोच्या बाहेर पडले. प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची देखील या शोमध्ये सहभागी झाल्या.
काही आठवड्यात त्या देखील बाहेर पडल्या. भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई या देखील अवघ्या काही दिवसातच या घराच्या बाहेर पडल्या. वाईल्ड कार्डद्वारे नीथा शेट्टी हिला देखील या शो मध्ये एन्ट्री मिळाली होती. ती देखील अवघ्या काही दिवसात घराच्या बाहेर पडली.
आता या आठवड्याच्या नोमिनेशनमध्ये विकास पाटील, सोनाली पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे यामध्ये सगळ्यात जास्त मते घेणारा स्पर्धक शोमध्ये राहिला. एक स्पर्धक या शोतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे आता 4 पैकी कोण बाहेर पडतो, हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे.
सगळ्यात जास्त मतदान एक क्रमांकावर विकास पाटील याने घेतले आहे. त्यामुळे त्याची जागा आता या शोमध्ये सध्यातरी फिक्स आहे. त्यानंतर सोनाली पाटील हिने देखील बर्यापैकी मतदान घेऊन दोन दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिसऱ्या क्रमांकावर उत्कर्ष शिंदे आहे आणि चौथ्या क्रमांकावर मीरा जगन्नाथ ही आहे.
तिच्यावर प्रेक्षक खूप नाराज होते. त्यामुळे तिला कमी मतदान मिळाले. त्यामुळे मीरा जगन्नाथ या आठवड्यात या शोच्या बाहेर पडू शकते. मात्र, आठवड्याच्या शेवटी या घराच्या बाहेर कोण पडणार आपल्याला समजणार आहे. आपल्याला बिग बॉस सोशलबद्दल काय वाटते ते आम्हाला नक्की सांगा.