‘बिगबॉस’ मधल्या कलाकारांचे खरे वय, एक सदस्य तर फक्त …

कलर्स मराठी वर सुरू असलेला मराठी बिग बॉस हा शो अनेकांच्या आवडीचा शो बनला आहे. या शोमध्ये सहभागी झालेले कलाकार काय करतात, त्यांचे वय किती आहे याबाबत अनेकांना माहिती नसते. अनेकांना ते जाणून घेण्याची इच्छा असते. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये कलर्स मराठीमध्ये सहभागी झालेल्या काही कलाकारांचे वय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
1) मीरा जगन्नाथ – या शोमध्ये सहभागी झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच मीरा जगन्नाथ ही अनेकांसोबत वाद घालताना दिसत आहे. असे असले तरी ती अतिशय सुंदर दिसते. मीरा हिचा जन्म २० ऑगस्ट १९९८ रेजी झाला असून तिचे वय २३ वर्षे आहे.
2) विकास पाटील – बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झालेला विकास पाटील हादेखील अनेकांच्या आवडतीचा स्पर्धक बनलेला आहे. विकास पाटील याचा जन्म २४ सप्टेंबर १९८२ रोजी झाला आहे. त्याचे वय ३९ वर्षे आहे.
3) नीथा शेट्टी – नीता शेट्टी ही वाइल्ड कार्ड एन्ट्री मधून बिग बॉस च्या घरामध्ये सहभागी झालेली आहे. ती अतिशय दिसायला सुंदर अशी आहे. तिचा देखील वेगळा चाहता वर्ग आहे. तिचे वय ते ३३ वर्ष आहे.
4) तृप्ती देसाई – भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई नुकत्याच या घराच्या बाहेर पडलेल्या आहेत. पाच जणांपैकी त्यांचे नॉमिनेशन झालेले आहे. समाजामध्ये त्या मोठ्या प्रमाणात महिलांसाठी आंदोलन करत असतात. त्यांचे वय वर्ष ३५ आहे.
5) संतोष चौधरी – संतोष चौधरी उर्फ दादुस हा लोकप्रिय कोकणी गायक आहे. बिग बॉसच्या घरात मध्ये त्याची चांगलीच चर्चा होताना दिसत असते. त्याचा जन्म १९७८ रोजी झाला आहे. त्याचे वय वर्ष ४३ आहे.
6) मीनल शाह – बिग बॉसच्या घरामध्ये सर्वाधिक चांगला खेळ करणारी स्पर्धक म्हणजे मीनल शहा आहे. मीनल शहा ही अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या सोबत बोलत असते. तिचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी झाला आहे. तिचे वय २९ वर्षे आहे.
7) स्नेहा वाघ – स्नेहा वाघ हीदेखील या शो मध्ये चर्चेत आहे. तिचा घटस्फोटीत पती अविष्कार दारव्हेकर देखील या शोमध्ये सहभागी झाला होता. स्नेहा हिचा जन्म ४ऑक्टोबर १९८७ रोजी झाला असून वय ३४वर्षे आहे.
8) सोनाली पाटील – सोनाली पाटील देखील या शोमध्ये चांगला खेळ खेळताना दिसत आहे. ती मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचा जन्म ५ मे १९८७ रोजी झाला आहे. तिचे वय ३४ वर्षे आहे.
9) विशाल निकम – विशाल निकम हा देखील उत्तम खेळ बिग बॉस च्या घरामध्ये खेळताना दिसत आहे. त्याचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ रोजी झाला आहे. त्याचे वय २७ वर्षे आहे.
10) जय दुधाने – जय हा मॉडल आणि उद्योगपती आहे. तो या शोमध्ये अनेकांसोबत भांडताना दिसत आहे. त्याचा जन्म २५ जुलै १९९८ रोजी झाला आहे. त्याचे वय 23 वर्षे आहे.
11) गायत्री दातार – गायत्री दातार ही या शोमध्ये अनेकांच्या निशाण्यावर आहे. तिला अनेक जण या शोमध्ये बुगुबुगु असे म्हणतात. त्यामुळे तिला बाहेर काढा, अशी मागणी देखील होत आहे. तिचा जन्म ३० जुलै १९९३ रोजी झाला आहे. तिचे वय २८ वर्षे आहे.