‘बिगबॉस’ मधील या अभिनेत्रीला तिचा दुसरा घटस्फोटीत पती म्हणाला, घराच्या बाहेर ये, अन दाखव…

मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. मात्र, हे पर्व सुरुवातीच्या दिवसापासूनच वादग्रस्त ठरले आहे. बिग बॉस हा शो म्हटला की, त्यामध्ये वाद तर होणारच. यामध्ये अनेक अभिनेता व अभिनेत्री सहभागी झाले आहेत. यामध्ये दिग्गज अभिनेत्री स्नेहा वाघ ही देखील सहभागी झाली आहे.
विशेष म्हणजे या शोमध्ये तिचा माजी पती अविष्कार दारव्हेकर हा अभिनेता देखील सहभागी झाला आहे. अविष्कार आणि स्नेहा वाघ यांनी नऊ वर्षांचा संसार केल्यानंतर घटस्फोट घेतला होता. वयाच्या 19 व्या वर्षी तिने अविष्कार सोबत लग्न केले होते. स्नेहा वाघ हिची कारकीर्द तशी वादग्रस्तच राहिलेली आहे.
स्नेहा वाघ हिने तिच्या आयुष्यामध्ये दोन लग्न केले असले तरी ती अजूनही एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. स्नेहा वाघ हिने ‘मेरे साई’ या मालिकेत देखील काम केले होते. तिच्या या मालिकेतील भूमिकेचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. त्यानंतर स्नेहा वाघ हिने “चंद्रगुप्त मौर्य” या मालिकेतील काम केले.
या मालिकेत तिच्यासोबत फैजल खान हा अभिनेता दिसला होता. यामध्ये या दोघांनी आई मुलाची भूमिका साकारली होती. मात्र, असे असले तरी ऑफ स्क्रीन या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती आणि त्यामुळेच फैजल खान याच्या प्रेयसीने त्याला सोडले, याची चर्चा देखील होती. फैसल खान याच्या प्रेयसीचे नाव मुस्कान कटारिया असे होते.
मात्र, यानंतर स्नेहा वाघ हिने सांगितले होते की, माझा या प्रकरणाची अजिबात संबंध नाही. काही दिवसांपूर्वी स्नेहा वाघ हिने एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये तिने आपला दुसरा पती अनुराग सोळंकी याच्यावर टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये स्नेहा वाघ म्हणते की, माझे दुसरे लग्न हे वादग्रस्त ठरले. आम्ही आठ महिन्यांतच घटस्फोट घेतला होता.
मात्र, मला असे नेहमी वाटायचे की, हा व्यक्ती माझ्यासाठी नाही आहे. सत्य हे बोलायला मला आवडते. मी खूप जिद्दी मुलगी आहे आणि जिद्दी मुली पुरुषांना आवडत नाहीत, असेही ती म्हणाली. तसेच माझे मला स्वातंत्र्य मिळत नव्हते. त्यामुळे मी त्याच्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, असे ती म्हणाली.
असे स्नेहा वाघ हिने सांगितल्यानंतर अभिनेत्री काम्या पंजाबी हिनेदेखील स्नेहा वाघवर टीका करताना ट्विट वरुन वार केला आहे. यावर तिचा दुसरा पती अनुराग याने देखील टीका करताना सांगितले आहे की, एखाद्या शोमध्ये प्रसिद्धी मिळविण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल, हे सांगता येत नाही.
जर मी तुला त्रास दिला असेल, तुला मारहाण केली असेल किंवा तुला कौटुंबिक हिंसाचार केला असेल, तर तू बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर माझ्याकडे पुरावे सादर करावे, असे आव्हान देखील त्याने दिले आहे. त्यामुळे आता स्नेहा वाघ या प्रकरणावर नेमके काय बोलणार ते येणाऱ्या काळातच कळणार आहे.