अबब ! ‘बिगबॉस’ मधील कलाकारांना मिळतंय चक्क एवढं मानधन, एक स्पर्धक तर एका भागासाठी घेतोय 40 हजार रुपये

अबब ! ‘बिगबॉस’ मधील कलाकारांना मिळतंय चक्क एवढं मानधन, एक स्पर्धक तर एका भागासाठी घेतोय 40 हजार रुपये

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या मराठी बिग बॉस चा तिसऱ्या पर्वामध्ये अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. या कलाकारांमध्ये सध्या वादाचे प्रसंग देखील घडताना दिसत आहेत. असे असले तरी बिग बॉस त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा कायम प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसापासून या शोमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.

कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील आणि डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडलेले आहे. त्याचप्रमाणे मीरा जगन्नाथन हिने देखील अनेकांसोबत वाद घातला आहे. बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांना किती मानधन मिळते. याबाबत अनेकांना माहिती हवी होती. आज आम्ही आता याबाबतची माहिती देणार आहोत.

1) स्नेहा वाघ – स्नेहा वाघ बिग बॉस शो मध्ये खूपच चर्चेत आलेली आहे. बिग बॉसमध्ये एका भागासाठी स्नेहा हिला जवळपास वीस हजार रुपये मानधन मिळते. सध्या स्नेहाचे वय 33 वर्ष आहे.

2) विकास पाटील – विकास पाटील देखील हा बिग बॉस मध्ये सध्या चांगलाच चर्चेत आहे. विकास पाटीलचे वय सध्या 39 वर्षे आहे आणि त्याला जवळपास एका भागासाठी दहा हजार रुपये मानधन मिळते.

3) मीरा जगन्नाथ – मीरा जगन्नाथ सुरुवातीपासूनच या शोमध्ये चर्चेत आहे. मीरा जगन्नाथ ही केवळ सध्या 22 वर्षाची आहे. आणि तिला या शोच्या एका भागासाठी अठरा हजार रुपये मानधन मिळते.

4) सोनाली पाटील – सोनाली पाटील हिचे वय सध्या 34 वर्षाचे आहे. तिला एका भागासाठी जवळपास 28 हजार रुपये मानधन मिळते. सोनाली पाटील ही देव माणूस या मालिकेत झळकली होती.

5) जय दुधाने – जय दुधाने हा एक मॉडेल आहे. त्याचे वय सध्या तेवीस वर्षांचे आहे. आणि तो बिग बॉस च्या एका भागासाठी जवळपास 40 हजार रुपये मानधन घेतो. त्याला सर्वाधिक मानधन देण्यात येते.

6) गायत्री दातार – तुला पाहते रे या मालिकेतील गायत्री दातार चर्चेत आलेली आहे. गायत्री दातारचे वय 28 वर्षे आहे आणि तिला बिग बॉसच्या एका भागासाठी जवळपास 35 हजार रुपये मानधन मिळते.

7) विशाल निकम – विशाल निकम हा मूळचा सांगलीचा रहिवासी आहे. त्याचे वय सध्या 27 वर्षाचे आहे आणि त्याला बिग बॉस च्या एका भागासाठी जवळपास 15 हजार रुपये मानधन मिळते.

8) सुरेखा कुडची – सुरेखा कुडची यांनी आजवर अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. सध्या त्यांचे वय पन्नास वर्षाच्या आहे आणि त्यांना बिग बॉस च्या एका भागासाठी केवळ आठ हजार रुपये मानधन मिळते.

Team Beauty Of Maharashtra