‘बिगबॉस’ च्या घरात परत येणार घरातून बाहेर पडलेले हा लोकप्रिय स्पर्धक ?

‘बिगबॉस’ च्या घरात परत येणार घरातून बाहेर पडलेले हा लोकप्रिय स्पर्धक ?

कलर्स मराठी वर सुरू असलेला मराठी बिग बॉस शो आता चांगलाच चर्चेत आलेला आहे. हा शो सुरू होऊन जवळपास पंचावन दिवसाचा कालावधी लोटला आहे. तर आता या घरांमध्ये नऊ ते दहा सदस्य राहिलेले आहेत. काही दिवसापूर्वीच स्पर्धक नीता शेट्टी ही देखील घराबाहेर पडली आहे.

वाइल्ड कार्ड एन्ट्री द्वारे ती घराच्या आत मध्ये आली होती. काही दिवस तिला या घरामध्ये राहावे लागले. मात्र, तिला महेश मांजरेकर यांनी नॉमिनेट केले, तर या शोमध्ये आतापर्यंत वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळालेले दोन स्पर्धक होते आणि दोन्ही स्पर्धक अवघ्या काही दिवसातच घराच्या बाहेर पडले.

एक स्पर्धक म्हणजे आदिश वैद्य होता. आणि दुसरी म्हणजे नीता शेट्टी. हे दोघेही आता घराबाहेर पडलेले आहेत, तर याआधी अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, अविष्कार दारव्हेकर, भुमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्यासह कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील हे सर्व बाहेर पडलेली आहे.

यातील शिवलीला बाळासाहेब पाटील हिने आपण होऊन हा शो सोडला आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करून आपण हा शो सोडत असल्याचे सांगितले होते. तिच्यावर वारकरी संप्रदायातून खूप मोठी टीका झाली होती. नीता शेट्टी ही घराच्या बाहेर पडताना विशाल निकम हा खूप रडला.

विशाल आणि नीता यांचे खूप चांगले बाँडिंग होते. त्यामुळे तो रडला तर या शोमधून अविष्कार दारव्हेकर हा बाहेर पडला आहे, तर त्याची घटस्फोटित पत्नी आता सध्या शो मध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मजेशीर घटना घडामोडी यामध्ये घडणार आहेत. बिग बॉस च्या घरामध्ये वेगवेगळे टास्क स्पर्धकांना देण्यात येतात.

या दरम्यान अनेकदा भांडणं झाल्याचे देखील आपण पाहिलेली आहे. मीरा जगन्नाथ या शोमध्ये पहिल्या दिवसापासूनच वाद घालताना दिसत आहे. तिचा अनेकांसोबत वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉस म्हणजे महेश मांजरेकर यांनी देखील मीरा जगन्नाथ हिला चांगलेच रडारवर घेतले होते‌.

तरीदेखील ती सुधारण्याचे नाव घेताना दिसत नाही, तर गायत्री दातार हिला देखिल अनेकांनी बुगुबुगु म्हणून चिडवण्यास सुरुवात केली आहे. गायत्री दातार हिला देखील शोच्या बाहेर काढा, असे अनेकांनी सांगितले होते, तर मध्यंतरी दादुस यांना सगळ्यात कमी मतदान पडले होते. तरीदेखील ते घरातच राहिले.

याबाबतही अनेकांनी बिग बॉस वर चांगलीच टीका केली होती, तर आता बिग बॉस मध्ये सगळ्यात आधी या घराच्या बाहेर पडलेला स्पर्धक अक्षय वाघमारे पुन्हा घरामध्ये येतो की, काय अशी चर्चा रंगू लागली आहे. याचे कारण म्हणजे अक्षय वाघमारे याने स्वतःहून एक पोस्ट केलेली आहे.

या पोस्टमध्ये अक्षय वाघमारे म्हणतो की, वाइल्ड कार्डद्वारे एन्ट्री मिळालेले दोन्ही स्पर्धकही बाहेर पडलेले आहेत. आता या घरामध्ये एखादा घराबाहेर पडलेला सदस्य पुन्हा येऊ शकतो का? आपल्याला काय वाटतं. त्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तुलाच आम्हाला या शोमध्ये परत पहायला आवडेल, असे सांगितले आहे.

त्यावर अक्षय वाघमारे म्हणाला की, मला एकाने असे विचारले की, बिग बॉस च्या घरामध्ये पुन्हा तुला पाहायला आवडेल. आता पुढे काय होते ते बघू, आपण असे त्याला म्हटले आहे. त्यामुळे आता अक्षय वाघमारे पुन्हा आपल्या शोमध्ये दिसणार का? हे लवकरच कळणार आहे.

Team Beauty Of Maharashtra