त्या ‘एका शब्दामुळे स्नेहा वाघ वर भडकले प्रेक्षक, प्रेक्षक म्हणाले “तुला काही अक्कल आहे का?”

त्या ‘एका शब्दामुळे स्नेहा वाघ वर भडकले प्रेक्षक, प्रेक्षक म्हणाले “तुला काही अक्कल आहे का?”

कलर्स मराठी या वाहिनीवर 19 सप्टेंबरपासून मराठी बिग बॉस चे तिसरे पर्व सुरू झाले आहे. या तिसऱ्या पर्वामध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. मात्र, सगळ्यांच्या नजरा या स्नेहा वाघ हिच्यावर खिळल्या होत्या. कारण या शोमध्ये अविष्कार दारव्हेकर हा तिचा माजी पती देखील सहभागी झाला होता.

सुरुवातीच्या म्हणजे पहिल्याच दिवशी दोघांनी एकमेकांशी संभाषण केले नाही. मात्र, या दोघांचा संपर्क हा झाला तसा दोघेही एकमेकांशी बोलू लागले होते. अविष्कार दारव्हेकर याचे नुकतेच नॉमिनेशन झाले आहे. अविष्कार दारव्हेकर हा आता शोच्या बाहेर पडला आहे.

शोच्या बाहेर पडल्यानंतर सगळ्यांनी त्याला निरोप देखील दिलेला आहे. त्यामुळे आता या शोमधून अक्षय वाघमारे आदीश वैद्य, सुरेखा कुडची यांच्यानंतर अविष्कार दारव्हेकर हा देखील घराच्या बाहेर पडला आहे. तर शिवलीला बाळासाहेब पाटील हिने देखील हा शो सोडला आहे.

अविष्कार दारव्हेकर याने स्नेहा वाघ सोबत काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. या दोघांनी जवळपास नऊ वर्षांचा संसार केला होता. स्नेहा वाघ ही या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर देखील तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती अविष्कार बद्दल बोलताना दिसत होती.

अविष्कार याने मला खूप त्रास दिला. त्याच्या एवढा त्रास मला कोणीही आजवर दिला नाही. माझे लग्न झाले, त्यावेळेस मी केवळ एकोणीस वर्षाची होते. त्यामुळेच मी त्याच्या कौटुंबिक हिंसाचाराची बळी पडले. नऊ वर्षांचा संसार केल्यानंतर मी त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला घेतला होता.

त्यानंतर अनुराग साळवी या फॅशन डिझायनर सोबत देखील लग्न केले होते. मात्र, या दोघांचा देखील काही महिन्यात घटस्फोट झाला होता. आता या शोमध्ये देखील या दोघांचे थोडेबहुत जमत असताना अविष्कार दारव्हेकर हा आता बाहेर पडला आहे. महेश मांजरेकर यांनी सांगितले की, हा अविष्कार याने समोर येऊन अजिबात खेळला नाही.

त्यामुळे त्याला या शोच्या बाहेर पडावे लागले. तरी देखील त्याला माझ्या शुभेच्छा आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. आता स्नेहा वाघ देखील या शोमध्ये खूपच ट्रॉल होताना दिसते आहे. अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. स्नेहा ही रोज सकाळी उठल्यानंतर रोज माईक समोर येते आणि माईक समोर येऊन सरांगी बिग बॉस, सरांगी असे म्हणत आहे.

त्यामुळे अनेक प्रेक्षकांना असा प्रश्न पडला आहे की, स्नेहा वाघ ही नेमक काय म्हणत आहे, तर सरांगी हा एक कोरियन शब्द आहे. सारंगी याचा अर्थ “आय लव यू” असा होतो. म्हणजेच ती बिग बॉस आय लव यु आय लव यु, असे म्हणत आहे. हे ऐकूनच स्नेहा वाघ हिच्या या वर्तनावर काही जण नाराज देखील झाल्याचे कळत आहे.तर आपल्याला स्नेहा वाघ हिचा या शोमधील परफॉर्मन्स आवडतो का? ते कमेंट बॉक्स नक्की सांगा.

Team Beauty Of Maharashtra