ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणारा क्रिकेटपटू होणार भारताचा ‘जावई’; लवकरच करणार लग्न !

ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणारा क्रिकेटपटू होणार भारताचा ‘जावई’; लवकरच करणार लग्न !

T20 वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाने विश्व विजेतेपदावर नाव कोरले आहे. न्यूझीलंड संघाला पराभवाची धूळ चारून ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियन संघ हा पहिल्यापासूनच अतिशय प्रबळ दावेदार मानला गेला.

मात्र, टी-20 मध्ये भारताकडे देखील मोठ्या आशेने पाहिले जायचे. मात्र, भारताने घोर निराशा केली त्याबरोबर पाकिस्तान संघाने देखील निराशा केली. आता ऑस्ट्रेलिया जगज्जेता झालेला आहे. ऑस्ट्रेलियन संघ पूर्वीपासूनच अतिशय जबरदस्त असा आहे.

पूर्वीच्या काळामध्ये ऑस्ट्रेलियन संघांमध्ये मार्क वॉ व स्टिव्ह वॉ यांच्या सारखी जबरदस्त अशी जोडी होती. त्याचप्रमाणे शेन वॉर्न सारखा फिरकीपटू होता. आजही ऑस्ट्रेलियन संघ जबरदस्त असाच आहे. न्युझीलँड संघाला चारीमुंड्या चित करण्यात आलेले आहे. डेव्हिड वॉर्नर ने 50 धावांची खेळी केली आणि विजयाचा पाया रचला.

त्यानंतर मिचेल मार्शने 77 धावा केल्या. मात्र, या सगळ्या मध्ये सगळ्यात शेवटी कडी केली ते ग्लेन मॅक्सवेलने त्याने विजयी चौकार ठोकून ऑस्ट्रेलिया ला जगज्जेते केले. त्याने एकोणिसाव्या शतकातच हा सामना संपवला. आता त्यानंतर ग्लेन हा एकदम चर्चेत आलेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच नाती तस फार पूर्वीपासून अतिशय चांगल अस आहे.

या दोन्ही देशांमध्ये अनेक व्यावसायिक पूर्ण संबंध तर आहेतच. त्याचप्रमाणे अनेक भारतीय लोकांचे ऑस्ट्रेलियात या लोकांशी नाते संबंध देखील असल्याचे पाहायला मिळते. आज आम्ही आपल्या ऑस्ट्रेलियाचा ग्लेन हा भारताचा जावई होणार आहे, याबाबतची माहिती देणार आहोत. यापूर्वी देखील 2014 मध्ये शॅन‌ टॅट याने भारतीय मॉडेल मासुम सिंगा सोबत लग्न केले होते.

आता ही जोडी अतिशय व्यवस्थित रित्या ऑस्ट्रेलिया मध्ये राहते. तसे पाहायला गेले तर शोएब मलिक हादेखील भारताचा जावई आहे. त्याने भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सोबत लग्न केले आहे, हे दोघेही आता आनंदात आहेत. त्यांना एक मूल देखील आहे. आता ऑस्ट्रेलियन सांघा मधला फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा देखील भारताचा जावई होणार आहे.

आता ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. मात्र, ग्लेन हा त्या दौर्‍यावर जातो की नाही हे पहावे लागेल. कारण त्याचे लग्न गेल्या काही दिवसांपासून रखडलेले आहे. कोरोनामुळे त्याचे लग्न लांबणीवर पडले होते. ग्लेन हा भारतीय वंशाच्या विनी रमण हिला 2017 पासून डेट करत आहे.

या दोघांची सगळ्यात आधी 2013 मध्ये भेट झाली होती. विनी ही तामिळ परिवारातून येते. ऑस्ट्रेलियामध्ये ती मेडिकल सायन्स ची विद्यार्थिनी आहे. या दोघांना देखील प्रवास करायला खूप आवडते. या दोघांनी या आधी पॅरिस लंडन न्यूझीलंड या देशांमध्ये प्रवास केला होता. आता हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते.

मार्च 2020 मध्ये या दोघांनी साखरपुडा उरकला होता. मात्र, त्यानंतर यांचे लग्न लांबणीवर पडल होत. मात्र, आता हे दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. त्यामुळे ग्लेन हा आता भारताचा जावई होणार आहे.

Team Beauty Of Maharashtra