BB3- ‘मी पणा सोडून दे’; उत्कर्षने दाखवला जयला आरसा, पडेल का मैत्रीत फूट.. जाणून घ्या सविस्तर

BB3- ‘मी पणा सोडून दे’; उत्कर्षने दाखवला जयला आरसा, पडेल का मैत्रीत फूट.. जाणून घ्या सविस्तर

बिग बॉस मराठीचा (Bigg boss marathi) ग्रँड फिनाले जसजसा जवळ येत आहे तसतशी या घरातील स्पर्धकांमध्ये होणारे मतभेद, गैरसमज वाढत आहे. काल झालेल्या भागात घरातील दोन सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला. हे सदस्य म्हणजे विकास (vikas patil) आणि मीनल (meenal shah).

विकास त्याच्या मुद्द्यावर अडून होता. तर मीनलही त्याला वारंवार स्पष्टीकरण देऊन कंटाळली होती. संपूर्ण सीझनमध्ये एकमेकांचे मित्र असलेल्या या दोघांनी मित्रत्वासाठी केलेली सगळी मदती बोलून दाखवली. त्यामुळे कालचा भाग चांगलाच गाजला. या दोघांच्या भांडणांनंतर आता उत्कर्ष आणि जयमध्ये वाद होणार आहे. या वेळी उत्कर्ष जयला आरसा दाखवणार आहे.

आज रंगणाऱ्या भागात घरातील प्रत्येकाला अन्य स्पर्धकांना एक सल्ला द्यायचा आहे. यामध्ये उत्कर्ष जयला सल्ला देणार आहे. मात्र, त्यामुळे जय चांगलाच दुखावला जाणार आहे.

“मित्रा प्लीझ मोठा हो ! मी पणा सोडून दे, मोठं घरं पोकळ वासा पण ____असं होऊ नये. राग आणि भीक माग ही म्हण लक्षात ठेवा मित्रा ! आपल्याकडे शक्ती आहे याचा अर्थ नाहीये की आपण समोरच्याची लायकीच काढली पाहिजे”,असं म्हणत उत्कर्षने जयला आरसा दाखवला. त्यावर जयनेही उत्कर्षला सडेतोड उत्तर दिले, “टाळी कधीचं एका हातानी वाजत नाही…”असं जय म्हणाला.

दरम्यान, आता या दोघांमधील वाद कुठपर्यंत जाणार आहे हे आजच्या भागातच प्रेक्षकांना समजेल. तसंच या वादानंतर यांच्यातील मैत्री टिकून राहिल का? असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे. अलिकडेच टीम B मध्ये फूट पडली असून आता टीम Aमध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय.

Team Beauty Of Maharashtra